प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या करणारा आरोपी गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 05:25 PM2018-08-04T17:25:51+5:302018-08-04T18:48:48+5:30

आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली होती घटना 

Accuse arrestd who has murdered girl in oneside love affair | प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या करणारा आरोपी गजाआड 

प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या करणारा आरोपी गजाआड 

Next

मुंबई - ठाण्यातील आरटीओ ऑफिस रोड परिसरात भरदिवसा प्राची झाडे या तरुणीवर आज सकाळी ११ च्या सुमारास चाकूने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या  हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकाच खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी आकाश पवारला (वय -२२) अटक केली आहे. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी विरोधात याआधी तक्रार केली असूनही कोणतीही कारवाई केली नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. आरोपी आकाश पवार याला नारपोली पोलीसांनी ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी त्याला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आकाश हा काल्हेर येथे राहणार असून ठाण्यातील कोपरी कॉलनीत राहणाऱ्या प्राची झाडेशी त्याचे एकतर्फी प्रेम होते असल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यातूनच हि हत्या झाली असावी. प्राची हि ठाण्यातील के. जी. जोशी कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होती. 

 

अधिक माहितीसाठी वाचा- प्रेम प्रकरणातून २१ वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला; हल्ल्यात तरुणीचा मृत्यू 

 

Web Title: Accuse arrestd who has murdered girl in oneside love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.