गोव्यातील मर्डर मिस्ट्री! इन्स्टावर मैत्री, व्हिलामध्ये पार्टी मग रक्तरंजित डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 07:54 AM2024-03-01T07:54:49+5:302024-03-01T07:55:13+5:30

व्हिलाची तपासणी करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज पाहिले जे दुसऱ्या बिल्डींगच्या कॅमेऱ्यात कैद झाले.

A 77-year-old businessman, Nims Dhillon from Punjab, found dead at a villa in Goa's | गोव्यातील मर्डर मिस्ट्री! इन्स्टावर मैत्री, व्हिलामध्ये पार्टी मग रक्तरंजित डाव

गोव्यातील मर्डर मिस्ट्री! इन्स्टावर मैत्री, व्हिलामध्ये पार्टी मग रक्तरंजित डाव

पणजी -  पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे चुलत भाऊ असलेले नरोत्तम सिंग यांची गोव्यातील व्हिलामध्ये हत्या करण्यात आली. या हायप्रोफाईल खुनाच्या घटनेनंतर पोलीस कारवाईत २ जणांना अटक केली. मात्र आता तिसऱ्या अटकेनंतर हे तिन्ही आरोपी मिळून नरोत्तम सिंग उर्फ ​​निम्स ढिल्लॉन यांना सेक्सटोर्शनद्वारे ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती समोर आली आहे. पण अखेरच्या क्षणी त्या तिघांच्या कटाचा पर्दाफाश झाला आणि मग त्यांनी नरोत्तम सिंगची हत्या केली.

गोवा पोलिसांना सकाळी फोन आला. कॉल करणारा सांगतो की, गोव्यात एका व्हिलामध्ये एका व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती दुसरा कोणी नसून त्या व्हिलाचा मालक नरोत्तम सिंग ढिल्लॉन आहे. ७७ वर्षीय नरोत्तम सिंग हे तीन आलिशान व्हिलाचे मालक होते. यातील एक व्हिला त्यांनी स्वतःचे निवासस्थान म्हणून वापरला, तर उर्वरित दोन व्हिला त्यांनी गेस्ट हाऊस म्हणून रूपांतरित केले.

पोलिसांनी मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता त्यांना नरोत्तम सिंग यांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले. ढिल्लॉन सहसा हातात कडा सोन्याच्या चेन आणि अंगठ्या घालत असे, परंतु ज्या लोकांनी त्यांना मारले त्यांनी हत्येनंतर लूटपाट केल्याचं दिसून येते. म्हणजेच प्रथमदर्शनी हे प्रकरण दरोड्याच्या उद्देशाने खुनाचे प्रकरण असल्याचे दिसत होते. पोलिस व्हिलामध्ये पोहोचले, पोलिस स्निफर डॉग आणि फॉरेन्सिक टीमने आपापल्या मार्गाने खुन्याचा सुगावा गोळा करण्याचा प्रयत्न केला. 

त्याचवेळी व्हिलाची तपासणी करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज पाहिले जे दुसऱ्या बिल्डींगच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या फुटेजमध्ये रात्री साडे तीनच्या सुमारात ढिल्लॉन एका कारमधून रवाना झाले. त्यानंतर ३ फेब्रुवारीला एक जोडपे व्हिलात पार्टी करण्यासाठी पोहचले. घटनेच्या आदल्यादिवसापर्यंत अनेक पाहुणे ढिल्लॉन यांच्या गेस्टहाऊसवर पार्टी करत होते. त्यामुळे पोलिसांनी या दिशेने तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर घटनेच्या रात्री काहीजण व्हिलातून बाहेर पडत होते, मात्र ते मुख्य दरवाजाने न जाता खिडकीचा वापर करत असल्याचे दिसले. 

ढिल्लॉन यांची हत्या, त्यांच्या व्हिलाच्या बाहेर पडलेले कपल याशिवाय गोवा पोलिसांना आणखी एक तक्रार एका कार मालकाची मिळाली होती. रेंट ए कारच्या एका व्यक्तीने कपलला कार भाड्याने दिली. मात्र ते कार घेऊन गोव्याच्या बाहेर गेले. ते फोनही उचलत नव्हते. या दोन्ही प्रकरणाने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी चौकशी करून त्या मुला मुलीला अटक केली. संशयास्पद जोडप्याला अटक केल्यानंतर चौकशीत वेगळे सत्य बाहेर पडले. लुटीच्या हेतूने नव्हे तर सेक्सटॉर्शन टोळीशी त्यांचा संबंध होता. ढिल्लॉन यांना जाळ्यात अडकवून ते पैसे लाटत होते. मात्र कट पूर्ण होण्याआधीच त्यांची पोलखोल झाली. इन्स्टाग्रामवर एका मुलीसोबत मृत व्यक्तीची ओळख झाली. त्यानंतर मृत व्यक्तीला जाळ्यात अडकवले गेले. आरोपींनी चौकशीत गुन्हा कबुल केल्याची माहिती आहे. 

Web Title: A 77-year-old businessman, Nims Dhillon from Punjab, found dead at a villa in Goa's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.