भायखळा परिसरातून 46 लाख 21 हजार रक्कम जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 13:55 IST2019-04-24T13:51:20+5:302019-04-24T13:55:15+5:30

याबाबत आयकर विभाग अधिक चौकशी करीत आहे

46 lakh 21 thousand cash seized in the area of Byculla | भायखळा परिसरातून 46 लाख 21 हजार रक्कम जप्त 

भायखळा परिसरातून 46 लाख 21 हजार रक्कम जप्त 

ठळक मुद्देभायखळा विधानसभा मतदारसंघातील युवराज पाटील यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे  ईको  या  (एम.एच.03 बी. सी. 312) वाहनाची तपासणी केली. या वाहनात ईश्वर प्रसाद सोलंकी यांच्याकडे 46 लाख 21 हजार रुपये रक्कम आढळून आली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भायखळा भागात काल  निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे 46 लाख 21 हजार रुपये रोकड रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.   

काल सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास  भगवा महल, बी.जे.मार्ग ,सात रस्ता परिसरात भायखळा विधानसभा मतदारसंघातील युवराज पाटील यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे  ईको  या  (एम.एच.03 बी. सी. 312) वाहनाची तपासणी केली. या वाहनात ईश्वर प्रसाद सोलंकी यांच्याकडे 46 लाख 21 हजार रुपये रक्कम आढळून आली. याबाबत आयकर विभाग अधिक चौकशी करीत आहे. अशी माहिती 31-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली. 

Web Title: 46 lakh 21 thousand cash seized in the area of Byculla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.