प्रेम प्रकरणातून २१ वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला; हल्ल्यात तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 13:58 IST2018-08-04T13:24:53+5:302018-08-04T13:58:06+5:30
भररस्त्यात तरुणीची चाकूनं वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

प्रेम प्रकरणातून २१ वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला; हल्ल्यात तरुणीचा मृत्यू
ठाणे - भरदिवसा एक 21 वर्षीय तरुणीची चाकूनं वार करुन हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ठाणे हायवेलगत आरटीओच्यासमोरील परिसरात शनिवारी (4ऑगस्ट) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 22 वर्षीय विकास पवार नावाच्या तरुणाने प्राची विकास झाडेवर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात प्राची झाडेचा जागीच मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आरोपी विकास पवार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नौपाडा पोलीस ठाणे याप्रकरणी तपास करत आहेत. दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीची हत्या करण्यात आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.