दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या हिशेब तपासनीसाला अटक; शिवडी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:00 PM2019-02-14T23:00:00+5:302019-02-14T23:00:02+5:30

फसवणुकीतल्या रक्कमेतून बदलापूर येथे घर, पत्नीसाठी 24 तोळे सोनं खरेदी केले आहेत. हे घर आणि सोने त्याने गहाण ठेवून त्यावर ही पैसे उधारीवर घेतले आहे.

2 crore fraud by accountant; sewree police arrested | दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या हिशेब तपासनीसाला अटक; शिवडी पोलिसांची कारवाई

दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या हिशेब तपासनीसाला अटक; शिवडी पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देशिवडी रेल्वे स्थानकानजीक एका खासगी कंपनीत पांड्या हा 2011 मध्ये अकाऊंटंट म्हणून नोकरीला राहिला होता. या कंपनीतील सर्व व्यवहार पांड्याच्या निदर्शनाखाली होत होते. तो स्वतःच्या कंपनीची सर्व खाती हाताळत असल्यामुळे पैशांचे गैरव्यवहार तो सोयीस्करपणे करत होता.  शिवडी पोलिसांनी पांड्याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

मुंबई - शिवडी परिसरातील एका खासगी कंपनीला २ कोटींचा गंडा घालणाऱ्या हिशेब तपासनीसाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिनेश पांड्या (42) याने 2012 ते 2019 या काळात कंपनीच्या १ कोटी 98 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या पैशातून त्याने घर, जमिनी, गाडी आणि पत्नीसाठी दागिने घेतल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.  
शिवडी रेल्वे स्थानकानजीक एका खासगी कंपनीत पांड्या हा 2011 मध्ये अकाऊंटंट म्हणून नोकरीला राहिला होता. या कंपनीतील सर्व व्यवहार पांड्याच्या निदर्शनाखाली होत होते. या गोष्टीचा फायदा घेत पांड्याने व्यवहारातील पैसे ट्‌प्या टप्याने गैरव्यवहार करत स्वतःच्या खात्यावर वळवण्यास सुरूवात केली. सन 2012 आणि 2013 वर्षादरम्यान पांड्याने पहिल्यांदा टप्या टप्याने 10 लाख 85 हजार 530 रुपये स्वतःच्या खात्यावर वळवले. त्यानंतर 2013-2014 मध्ये 23 लाख 94 हजार, 2015-2016 मध्ये 37 लाख 95 हजार, 2016-2017 मध्ये 29 लाख 86 हजार आणि 2017- 2018 मध्ये 32 लाख टप्या टप्याने वळवले. तसेच 2018 - 2019 मध्ये पांड्याने 7 लाख 83 हजार खात्यावर वळवले होते. तो स्वतःच्या कंपनीची सर्व खाती हाताळत असल्यामुळे पैशांचे गैरव्यवहार तो सोयीस्करपणे करत होता.  
दरम्यान, नोव्हेंबर 2018 मध्ये पांड्या काही कामानिमित्त सुट्टीवर गेला होता. मात्र, सुट्टीवर जाण्यापूर्वी त्याने 1 लाख रुपयांचा व्यवहार स्वतःच्या खात्यावर केले होते. सुट्टीवर गेल्यानंतर पांड्याचा सहकाऱ्याला हिशोबात तफावत आढळून आल्याने त्याने ही बाब कंपनीच्या मालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघड झालायचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी कंपनीतर्फे हर्शद पोपट यांनी शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना हर्षदने फसवणुकीतल्या रक्कमेतून बदलापूर येथे घर, पत्नीसाठी 24 तोळे सोनं खरेदी केले आहेत. हे घर आणि सोने त्याने गहाण ठेवून त्यावर ही पैसे उधारीवर घेतले आहे. तसेच काही रक्कम त्याने आपल्या पत्नीच्या खात्यावर ही वळवली आहे. तसेच फसवणूकीच्या पैशातून एक गाडी आणि इंदौर, अहमदनगर येथेही जागा घेतल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, शिवडी पोलिसांनी पांड्याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

Web Title: 2 crore fraud by accountant; sewree police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.