मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलिसांनी मागणीच केली नाही

By पूजा प्रभूगावकर | Published: January 19, 2024 04:53 PM2024-01-19T16:53:36+5:302024-01-19T16:53:48+5:30

कळंगुट पोलिसांनी न्यायालयाकडे तिच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती न करता तिला कारागृहात पाठवावे असे नमूद केले.

13-day judicial custody to Suchana Seth, who killed the boy | मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलिसांनी मागणीच केली नाही

मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलिसांनी मागणीच केली नाही

पणजी: आपल्या चार वर्षीय मुलाच्या खूनाचा आरोप असलेल्या सूचना सेठ हिला शुक्रवारी पणजी येथील बाल न्यायालयाने १३ दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली.

तिची न्यायालयीन कोठडी बुधवार ३१ जानेवारी पर्यंत कायम असेल. कळंगुट पोलिसांनी न्यायालयाकडे तिच्या पोलिस कोठडीत वाढ करावी अशी विनंती न करता तिला कारागृहात पाठवावे असे नमूद केले. त्यानुसार बाल न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले.
दरम्यान सूचना सेठ हिच्यावतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला जावू शकते. मात्र सध्या तरी तो कधी दाखल केला जाईल हे स्पष्ट नसल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले.

दरम्यान सूचना सेठ हिने आपल्याच मुलाचा खून केल्याने तिला कुठला मानसिक आजार आहे का, तपासण्यासाठी तिची मनोरुग्ण इस्पितळात मानसिक चाचणी करण्यात आली. मात्र या चाचणीत तिला कुठलाही मानसिक आजार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: 13-day judicial custody to Suchana Seth, who killed the boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.