तरुणीवर अत्याचार करीत व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी

By राम शिनगारे | Published: April 14, 2024 09:16 PM2024-04-14T21:16:08+5:302024-04-14T21:16:46+5:30

सराईत गुन्हेगाराचे कृत्य : बलात्कारासह ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

Threatening to make the video viral by abusing the young woman | तरुणीवर अत्याचार करीत व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी

तरुणीवर अत्याचार करीत व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसापूर्वी पोलिसांनी नशेच्या औषधांचा साठा जप्त केलेल्या सराईत गुन्हेगाराने एका तरुणीवर अत्याचार करीत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी फैसल उर्फ तेजा (२५, रा. किलेअर्क) याच्या विरोधात बलात्कार, आयटीसह ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

सिडको पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पीडित तरुणीची कॉलेजमध्ये असताना एका मित्राने आरोपी फैसल तेजा याच्यासोबत ओळख करून दिली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर फैसल उर्फ तेजाच्या तिच्यावर राहत्या घरी नेऊन अनेकवेळा अत्याचार केले. १० एप्रिल रोजी त्याने मोबाईल संपर्क करीत तु घराबाहेर ये नाहीतर तुझे अश्लील व्हिडिओसह फाेटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यानुसार घराच्या बाहेर आलेल्या पीडितेला त्याने शिवीगाळ करीत मारहाण केली.तसेच गाडीवर बसवून त्याच्यासोबत घरी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने मारहाण करीत जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच त्याठिकाणी नग्न छायाचित्र, व्हिडिओ तयार केले. त्यानंतरही व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी त्याने बोलावून घेत तुझ्यामुळेच मी जेलमध्ये गेलो असल्याचे सांगत, मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने ११२ नंबर डायल करीत पोलिसांची मदत घेतली. बेगमपुरा पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन दवाखान्यात पाठविले. यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात करीत आहेत.
दोन दिवसापुर्वीच केली अटक

दोन दिवसापुर्वीच तेजाला गुन्हे शाखेच्या पथकाने किलेअर्क भागात अटक केली होती. त्याच्या ताब्यातून साडेसतरा हजाराचे नशेचे सिरप जप्त केले आहे. तेजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

Web Title: Threatening to make the video viral by abusing the young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.