फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मराठा तरुणांचे अर्धनग्न आंदोलन, जळगाव रोडवर रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:36 PM2024-02-16T17:36:13+5:302024-02-16T17:36:43+5:30

मराठा समाजाच्या आरक्षण मिळून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

Half-naked protest of Maratha youth in front of Phulumbri Tehsil Office, roadblock on Jalgaon Road | फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मराठा तरुणांचे अर्धनग्न आंदोलन, जळगाव रोडवर रास्तारोको

फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मराठा तरुणांचे अर्धनग्न आंदोलन, जळगाव रोडवर रास्तारोको

फुलंब्री: येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी एक वाजेपासून मराठा समाजाच्या तरुणांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर देखील आंदोलकांनी रास्तारोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली.  जरांगे यांच्या जीवाला धोका झाला तर सत्ताधारी नेत्यांच्या अंगातही कपडे ठेवणार नाहीत, असा इशारा तरुणांनी यावेळी दिला. 

मराठा समाजाच्या आरक्षण मिळून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर टी पॉइंट येथे आज दुपारी 12 वाजता मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महामार्ग बंद पडल्याने दोन्ही बाजूनी शेकडो वाहने थांबली होती.

आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी
एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदीसह अनेक घोषणा देऊन  केंदिय मंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावर मनोज जारंगे यांच्या विरुद्ध टाकलेल्या पोस्टचाही मराठा बांधवाकडून खरपूस समाचार घेण्यात आला. राणे विरोधात जोरदार घोषणा ही यावेळी देण्यात आल्या. 

Web Title: Half-naked protest of Maratha youth in front of Phulumbri Tehsil Office, roadblock on Jalgaon Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.