नाफेडची तूर खरेदी संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:20 IST2018-03-12T23:20:20+5:302018-03-12T23:20:20+5:30
नाफेडद्वारा वरोरा येथे तूर खरेदी फक्त एका काट्याद्वारे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून तूर खरेदीची गती वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची जलदगतीने तूर खरेदी करावी....

नाफेडची तूर खरेदी संथ गतीने
आॅनलाईन लोकमत
वरोरा : नाफेडद्वारा वरोरा येथे तूर खरेदी फक्त एका काट्याद्वारे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून तूर खरेदीची गती वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची जलदगतीने तूर खरेदी करावी तसेच नाफेडद्वारे चणा खरेदी सुरू करावा, अशी मागणी काँग्रेस नेते डॉ. विजय देवतळे यांनी नाफेडचे अधिकारी व तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजीव गांधी मार्केट यार्डला भेट दिली. तेव्हा शेतकऱ्यांना सोबत घेवून तूर खरेदी संदर्भात नाफेड व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. नाफेड मार्फत तूर खरेदी सुरू झाली असून आजपर्यंत १३०० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. महिन्याभरात केवळ १५० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली असून सध्या बाजारात तुरीचे भाव फारच कमी असल्यामुळे शेतकºयांत निराशा आहे. त्यातच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकच वजन काटा असून हमालाची संख्याही फारच कमी असल्याने दरदिवशी अत्यल्प तूर खरेदी केली जात आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली त्यांचे चुकारे अद्यापही बँक खात्यात जमा झालेले नाही.
मार्च महिन्याच्या शेवटी सोसायटी व बँकेचे कर्ज परतफेड करावे लागणार असल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे तत्काळ चुकारे अदा करून खरेदीची गती वाढवावी, चणा खरेदी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना नगराध्यक्ष विलास टिपले, मिलिंद भोयर, कन्हैयालाल जैस्वाल, दुर्गा ठाकरे, गिरीधर कष्टी, गुणवंत भोयर, वसंत विधाते आदी उपस्थित होते.