अवैध गौण खनिजाचे चार ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:27 IST2017-11-02T00:27:45+5:302017-11-02T00:27:57+5:30
काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार सचिन गोसावी यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करणाºयांवर तसेच तस्करी करण्यांवर बेधडक कारवाई सुरू केली आहे.

अवैध गौण खनिजाचे चार ट्रॅक्टर जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार सचिन गोसावी यांनी अवैध गौण खनिज उत्खनन करणाºयांवर तसेच तस्करी करण्यांवर बेधडक कारवाई सुरू केली आहे. यासाठी तीन पथके गठित केले असून या पथकाने बुधवारी चार ट्रकवर कारवाई केली.
या पथकामार्फत काही दिवसांपूर्वी एका बड्या नेत्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली होती. पथकाने २८ शनिवारी एक ट्रक व सोमवारी २ ट्रॅक्टर जप्त केले. तर मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास १ ट्रॅक्टर जप्त केल्याने अवैध गौण खनिज उत्खनन व तस्करी करणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे
बोर्डा येथील मनोज तेलंग यांच्या एमएच ३४ एल ९९०९ , दिलीप गंधारे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर एमएच ३४ एम ९४६२ व इम्रान मिया खान पठाण यांच्या एमएच ३४ एल ९५७८ या क्रमांकाची ट्रॅक्टर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध रेती तस्कारांत भिती पसरली असून ही कारवाई सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे.