वडगाव प्रभागातील नाल्या-रस्ते बांधकामासाठी निधी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:08 IST2017-10-08T22:07:48+5:302017-10-08T22:08:00+5:30
वडगाव हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर देणाºया प्रभागापैकी आहे. मात्र या प्रभागातील मोठा भाग अजूनही मूलभूत सुविधापांसून वंचित आहे.

वडगाव प्रभागातील नाल्या-रस्ते बांधकामासाठी निधी देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वडगाव हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर देणाºया प्रभागापैकी आहे. मात्र या प्रभागातील मोठा भाग अजूनही मूलभूत सुविधापांसून वंचित आहे. त्यामुळे या प्रभागातील नाल्या व रस्ते बांधकामासाठी निधी देण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
प्रभागात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यांचा अभाव आहे. जुन्या नाल्या जीर्ण झालेल्या आहेत. या संपूर्ण परिसरातील जमीन उंच व सखल असल्यामुळे नाल्याना योग्य उतार व आउटलेट नाही. परिणामी नाल्यांमध्ये पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. प्रभागात मोठ्या प्रमाणात खुले भूखंड असून या भूखंडामध्ये वर्षभर सांडपाणी साचून राहते. सांडपाण्याची घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
घाणीमुळे डुकरांचा हैदोस वाढला असून प्रभागातील आंबेडकर भवन सभागृह, वडगाव, साईनगर, नागरकर ले-आऊट, गजानन महाराज मंदिर, स्नेह नगर, दत्तनगर, लक्ष्मीनगर, विवेकानंद नगर, नानाजी नगर, हवेली गार्डन, साईबाबा मंदिर, अर्थव कॉलनी, ओम भवन परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांचा अभाव आहे. येथे दरवर्षी पावसाळ्यात बॅक वाटरमुळे पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होते.
त्यामुळे नगरसेवक पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात प्रहारच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन वडगाव प्रभागाच्या विकासाकरिता विशेष निधी देण्याची मागणी केली. पालकमंत्र्यानी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी प्रहारचे फिरोजखान पठाण, घनश्याम येरगुडे, सतीश खोब्रागडे, मीना कोतंबवार, मनीषा बोबडे, अक्षय येरगुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.