खोदकाम करताना सापडली दोन किलो चांदीची नाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:27 IST2017-11-01T00:26:26+5:302017-11-01T00:27:55+5:30
सिंदखेडराजा : शहरातील सोमवार पेठ बाजारगल्लीमध्ये घराच्या बांधकामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना विखुरलेल्या स्वरुपात ब्रिटिशकालीन एक रुपयांची चांदीची २५८ नाणी ३१ ऑक्टोबरला सापडली आहेत.

खोदकाम करताना सापडली दोन किलो चांदीची नाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : शहरातील सोमवार पेठ बाजारगल्लीमध्ये घराच्या बांधकामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना विखुरलेल्या स्वरुपात ब्रिटिशकालीन एक रुपयांची चांदीची २५८ नाणी ३१ ऑक्टोबरला सापडली आहेत. एसडीओ विवेक काळे, तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या उपस्थितीमध्ये या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खोदकाम करून ही नाणी गोळा करण्यात आली. आजच्या बाजारभावानुसार एक लाख १८ हजार रुपये त्यांची किंमत आहे.
राजे छत्रपती लखोजीराव जाधव यांची सिंदखेडराजा ऐतिहासिक शहर, अशी राजधानी होती. त्या राजधानीमध्ये त्यावेळेस चाळीस हजार लोकसंख्या होती. तेवढी लोकसंख्या त्यावेळेस मुंबई शहराचीसुद्धा नव्हती. लखोजीराव जाधवांच्या कार्यकाळात बँकासुद्धा नव्हत्या. रवी देशमाने यांच्या जागेमध्ये मातीत विखुरलेली ही नाणी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सापडली. ती पाहण्यासाठी नागरिकांनीही तेथे मोठी गर्दी केली होती. पोलिसांनाही त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बळीराम गीते, सहायक ठाणेदार संतोष नेमणार, शिवाजी शिंगणवाड, सुनील खेडेकरसह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले.
१८८८ ते १९१७ मधील नाणी
सापडलेली ही नाणी १८८६ ते १९१७ मधील आहेत. त्याचे वजन २ किलो ६७ ग्रॅम असून, त्याची किंमत १ लाख १८ हजार आहे. ही नाणी जप्त करण्यात आली असून, ट्रेझरी टू अँक्टनुसार संयुक्त कार्यवाही सुरु असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.