जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराज बेपत्ता, चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 06:10 AM2018-09-10T06:10:00+5:302018-09-10T06:10:08+5:30

Shankar Maharaj's disappearance of Jagriti Ashram's mantra, mention of five names in Chitthi | जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराज बेपत्ता, चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख

जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराज बेपत्ता, चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख

googlenewsNext

खामगाव: येथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प. पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे. नापासांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प. पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथित झाले होते. जागृती आश्रमाची जमीन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही जणांकडून त्यांना हेतुपुरस्परपणे त्रास दिला जात होता, असा उल्लेख शंकर महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. आश्रमाशी संबंधित पाच जणांनी सत्कार्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळेच आपण खामगाव सोडत असल्याचेही महाराजांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

जागृतीमधील वाद विकापोला जात असल्याचे निदर्शनास येताच, शंकर महाराजांनी गेल्या वर्षभरापूर्वीच सजनपुरी परिसरात तपोवनाची निर्मिती केली होती. तेव्हापासूनच महाराज शेलोडी येथील आश्रमात जाण्याचे टाळत होते.  परंतु यावादावर तोडगा निघत नसल्याने व्यथित झालेल्या महाराजांनी रविवारी तपोवन सोडले. आपला शोध न घेण्याची विनंतीही महाराजांनी चिठ्ठीत केली असून गेल्याकाही दिवसांपासून जागृतीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जागृती आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून महाराज निघून गेल्याच्या वृत्ताला दुजारो देण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रारीसंदर्भात तपोवन येथे बैठक सुरू होती. यासंदर्भात सोशल मिडीयावर देखील पोस्ट व्हायरल झाली असून, अनुयांकडून महाराजांचा शोध घेण्यात येत आहे. काही भाविक रात्रीच तपोवन येथे दाखल झाले असून, महाराज सुखरूप परत यावेत, यासाठी तपोवनात  हनुमान चालीसा पठण आणि सामुहिक प्रार्थना केली जात आहे.

सोमवारी चिठ्ठी वाचण्याचा दिला होता सल्ला!

शंकर महाराज तपोवनातून निघून गेल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. महाराजांनी तपोवन सोडण्यापूर्वी विश्वासू सेवेक-यांकडे एक चिठ्ठी सोपविली होती. ही चिठ्ठी सोमवारी सकाळी १० वाजता वाचावी, अशी आज्ञा शंकर महाराजांनी केली होती. मात्र, धक्कादायक बाबीमुळे  या चिठ्ठीचे रात्री वाचन करण्यात आले. त्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

Web Title: Shankar Maharaj's disappearance of Jagriti Ashram's mantra, mention of five names in Chitthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.