शालेय राज्य तलवारबाजी स्पर्धेत प्रणाली करंडेला कांस्य पदक

By Admin | Updated: September 29, 2016 01:37 IST2016-09-29T01:37:11+5:302016-09-29T01:37:11+5:30

शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये प्रणाली केले अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व.

School State Fencing Competition System Karandela Bronze Medal | शालेय राज्य तलवारबाजी स्पर्धेत प्रणाली करंडेला कांस्य पदक

शालेय राज्य तलवारबाजी स्पर्धेत प्रणाली करंडेला कांस्य पदक

बुलडाणा, दि. २८- चिखली येथील बुलडाणा तलवारबाजी असो. व साई शिक्षण क्रीडा व बहु. संस्था चिखली, अनुराधा इंग्लीश स्कुलची खेळाडु प्रणाली प्रकाश करंडे हिने विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे २0 ते २३ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व केले.
तिने वयोगट १७ वर्षे मध्ये मुलींच्या ईपी या प्रकारामध्ये कांस्यपदक पटकावून तिचे शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी हैद्राबाद तेलंगाना येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिने मागील २0१५-१६ वर्षात नॅशनल जम्परोप स्पर्धेत मंडळकर यांचे मार्गदर्शनाखाली सुवर्णपदक ६१ वी शालेय राष्ट्रीय टग ऑफ वॉर स्पर्धेत सबज्युनिअर गटात आंतरराष्ट्रीय खेळाडु श्रीराम यांचे मार्गदर्शनाखाली रौप्यपदक राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धेत रौप्यपदक व लगोरी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला तिला राष्ट्रीय कोच आशिष लोखंडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Web Title: School State Fencing Competition System Karandela Bronze Medal