Milk Supply : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा देवाला दुग्धाभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 14:50 IST2018-07-16T14:48:48+5:302018-07-16T14:50:50+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोदवड रोडवरील दळाचा मारोती येथील मंदिरात दुधाचा अभिषेक करत दूध दरवाढीसंदर्भात भाजपा सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना केली.

Milk Supply : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा देवाला दुग्धाभिषेक
मलकापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोदवड रोडवरील दळाचा मारोती येथील मंदिरात दुधाचा अभिषेक करत दूध दरवाढीसंदर्भात भाजपा सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना केली. एकिकडे हे सरकार सबसिडीनुसार शेतक-यांना म्हैस उपलब्ध करुन देते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करा, असे सल्ले देते. दुसरीकडे त्याच दुधाला पाहिजे तसा भाव देत नाही. याचा निषेध करण्यासाठी 16 जुलैला पहाटे बोडवड रोडवर अमर डेअरी यांची गाडी जात असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गाडी थांबवून दुधाने देवालाच अभिषेक घातला.
येत्या काळात दुधाला भाव मिळाला नाही तर पुन्हा एकदा शेतकरी संपावर जाणार,अशा इशाराही त्यांनी राज्यकर्त्यांना दिली व अजून शहर वासियांना दुधाचा तुटवडा पडल्यास त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील अशी ताकीद त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, शहर पोलिसांनी पाच आंदोलनकर्त्यांन जणांना पहाटे ३ वा स्थान बद्द केले. (तालुका प्रतिनिधी)