प्रेमी युगुलाने केले विष प्राशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:52 IST2017-08-26T00:47:16+5:302017-08-26T00:52:27+5:30

कुटुंबीयांनी लग्नास विरोध केल्याने प्रेमी युगुलाने विष  प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्या तील गवंढाळा येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. यातील युव तीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर अकोला येथे उपचार सुरू  आहेत.

Lovers lovers poisoned the poison! | प्रेमी युगुलाने केले विष प्राशन!

प्रेमी युगुलाने केले विष प्राशन!

ठळक मुद्देगवंढाळा येथील घटना प्रकृती गंभीर असलेल्या युवतीवर अकोला येथे उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  कुटुंबीयांनी लग्नास विरोध केल्याने प्रेमी युगुलाने विष  प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील गवंढाळा येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. यातील युव तीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर अकोला येथे उपचार सुरू  आहेत.
 गवंढाळा येथील विजय आनंदराव तायडे (वय २३) रा. गवंढाळा  व सपना दिलीप सरदार (वय २0) यांचे एकमेकांवर प्रेम आहे;  परंतु घरच्यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाला  विरोध केला. त्यामुळे सदर प्रेमी युगुलाने विषारी द्रव्य प्राशन केले.  तसेच सपना हिच्या हातावर ब्लेड मारल्याचे दिसले. सदर बाब  निदर्शनास येताच दोघांनाही उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले; परंतु सपना हिची प्रकृती गंभीर  असल्याने तिला पुढील उपचारार्थ अकोला येथे पाठविण्यात आले  आहे. तर विजय तायडे याच्यावर येथील सामान्य रुग्णालयात उ पचार सुरू आहेत. 

Web Title: Lovers lovers poisoned the poison!