चोरीच्या पाच दुचाकी जप्त, दोन आरोपींना पोलिस कोठडी

By विवेक चांदुरकर | Published: November 8, 2023 05:43 PM2023-11-08T17:43:32+5:302023-11-08T17:43:45+5:30

दुचाकी चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी अटक असून, त्यांच्याकडून ५ दुचाकी जप्त केल्या.

Five stolen bikes seized, two accused in police custody | चोरीच्या पाच दुचाकी जप्त, दोन आरोपींना पोलिस कोठडी

चोरीच्या पाच दुचाकी जप्त, दोन आरोपींना पोलिस कोठडी

मलकापूर (बुलढाणा) : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी अटक असून, त्यांच्याकडून ५ दुचाकी जप्त केल्या. आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. ६ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील सिंधी काॅलनीतील अनिल चुगवानी यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची एमएच २८ एवाय ९७१५ क्रमांकाची दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरून कलम ३७९, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुचाकी चोरीचा व अज्ञात चोरट्याचा तपास करीत असताना शेख साबीर शेख अहेमद, रा. सायकलपुरा व शेख नदीम शेख नईम, रा. अहमदशहापुरा पारपेठ यांनी एक दुचाकी चोरी केलेली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना त्यांच्या घरून चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अंदाजे २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक खामगाव अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर देवराम गवळी, पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे करुणाशील तायडे, सुपेश झाल्टे, आसीफ शेख, ईश्वर वाघ, प्रमोद राठोड, प्रवीण गवई, संतोष कुमावत, गोपाल तारुळकर यांनी केली.

Web Title: Five stolen bikes seized, two accused in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.