फवारणीमुळे शेतकर्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:43 IST2017-11-11T01:41:12+5:302017-11-11T01:43:39+5:30
चिंचपूर (ता. खामगाव): किटकनाशकाच्या विषबाधेमुळे येथील किसन उत्तम ठाकरे (पाटील) या शेतकर्याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फवारणीमुळे शेतकर्याचा मृत्यू
ठळक मुद्दे किटकनाशकाच्या विषबाधेमुळे झाला मृत्यू किसन ठाकरे हे शेतामध्ये तुरीवर फवारणी करण्यासाठी गेले
चिंचपूर (ता. खामगाव): किटकनाशकाच्या विषबाधेमुळे येथील किसन उत्तम ठाकरे (पाटील) या शेतकर्याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
९ नोव्हेंबर रोजी किसन ठाकरे हे शेतामध्ये तुरीवर फवारणी करण्यासाठी गेले. त्यांना शेतात विषबाधा झाली. उपचारासाठी त्यांना तातडीने बुलडाणा येथे नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान किसन ठाकरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे दोन एक्कर शेती असून त्यात उडीदाची पेरणी केली होती. त्यांना फक्त २४ किलो उडीद झाला असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.