२0 तासानंतर मिळाला भाविकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:58 IST2017-10-31T00:58:48+5:302017-10-31T00:58:56+5:30

पिंपळगाव सैलानी: सैलानी ढासाळवाडी तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोंडोली येथील कृष्णा काशिनाथ गिरनारे (३0) हा तलावामध्ये बुडाला होता. त्याला शोधण्यासाठी बुलडाणा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दिवसभर शोध घेतला होता; परंतु त्याचा शोध लागला नव्हता.

The body of the devotee received after 20 hours | २0 तासानंतर मिळाला भाविकाचा मृतदेह

२0 तासानंतर मिळाला भाविकाचा मृतदेह

ठळक मुद्देरविवारी बुडाला होता ढासाळवाडी तलावात

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सैलानी: सैलानी ढासाळवाडी तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोंडोली येथील कृष्णा काशिनाथ गिरनारे (३0) हा तलावामध्ये बुडाला होता. त्याला शोधण्यासाठी बुलडाणा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दिवसभर शोध घेतला होता; परंतु त्याचा शोध लागला नव्हता. ३0 ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्याचे प्रेत तलावाच्या कडेला तरंगताना नागरिकांना दिसले. यावरून रायपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी प्रेताचा पंचनामा करून प्रेत बुलडाणा सामान्य रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. हा भाविक सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आला होता. तलावामध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता. या तलावातील गाळ काढल्यामुळे या तलावामध्ये मोठा खोल खड्डा पडला आहे. त्याच खड्डय़ात गाळ साचल्याने त्या गाळात फसून भाविकांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये येथे वाढ होत आहे.    

Web Title: The body of the devotee received after 20 hours

टॅग्स :Crimeगुन्हा