पर्यटन क्षेत्र विकासासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:56 PM2017-09-29T23:56:55+5:302017-09-29T23:57:03+5:30
पवनी ऐतिहासिक वास्तू व मोठ्या संख्येने मंदिर असलेले शहर आहे. कित्येक मंदिर परिसरात मोकळी जागा उपलब्ध आहे. चंडिका मंदिर परिसरात टेकडी आहे, अशीच नगराचे तिन्ही बाजूला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवनी ऐतिहासिक वास्तू व मोठ्या संख्येने मंदिर असलेले शहर आहे. कित्येक मंदिर परिसरात मोकळी जागा उपलब्ध आहे. चंडिका मंदिर परिसरात टेकडी आहे, अशीच नगराचे तिन्ही बाजूला आहे. मंदिराच्या परिसरात लोकोपयोगी इमारती व टेकडीचे सौंदर्यीकरण केल्यास पर्यटक वाढतील, असा आशावाद बाळगून पर्यटन क्षेत्र विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
चंडिका माता मंदिर परिसरातील दसरा मैदानात आमदार स्थानिक विकास निधीतून बांधकाम झालेल्या रंगमंचाचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. भंडारा विधानसभा मतदारसंघातील पवनी व भंडारा ही दोन्ही मोठी शहरे विकासाच्या उच्च पातळीवर घेवून जाण्यासाठी मी प्रयत्न करित असल्याचे आ. रामचंद्र अवसरे यांनी सांगितले.
याप्रसंगी नगर परिषद अध्यक्षा पुनम काटेखाये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा बुराडे उपस्थित होत्या. यावेळी श्री चंडिका माता देवस्थान पंचकमेटी पब्लिक ट्रस्ट चे अध्यक्ष राजूभाई ठक्कर, उपाध्यक्ष मोडकूजी लोखंडे, सचिव देवाजी बावनकर, सदस्य बंडू बावनकर, लीलाधर मुंडले, नरेश बावनकर, विनायक मुंडले, बाळकृष्ण कलंत्री, धनराज लांबट, खेमराज बावनकर व अन्य मान्यवर सहकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर, संचालन सदस्य विनायक मुंडले व आभार प्रदर्शन अशोक पारधी यांनी केले. त्यानंतर गोपाल काला कीर्तणाला सुरूवात करण्यात आली. भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.