बांधकामाच्या तीन महिन्यातच पडले राज्य मार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:04 AM2017-10-28T00:04:04+5:302017-10-28T00:04:21+5:30

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले.

Three months after the construction of the pavement on the state road | बांधकामाच्या तीन महिन्यातच पडले राज्य मार्गावर खड्डे

बांधकामाच्या तीन महिन्यातच पडले राज्य मार्गावर खड्डे

googlenewsNext
ठळक मुद्देखड्डे दुरुस्तीची मागणी : राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, केसलवाडा रस्त्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले. कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या देखरेखीत झालेल्या कामावर शासनाचे अंदाजपत्रकीय ६४५.३२ लक्ष रुपये खर्ची पडले आहेत. मात्र, सदर रस्त्याचे काम पूर्ण होवून जेमतेम दोन ते तिन महिन्यांचा कालावधी लोटला असतांना रस्त्याला ठिकठिकाणी आडव्या नाल्या व खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्त्याच्या दर्जोन्नतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी,जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा यांच्या देखरेखीत पूर्ण करण्यात आले. दि.२१ सप्टेंबर २०१६ रोजी बोरी येथे आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते सदर कामाचे भुमीपुजन करण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असले तरी रस्त्याच्याकडेला अनेक ठिकाणी मुरुमाने कडा भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक रस्ता झालेला आहे. वाहनकडेला थांबविण्यासाठी अडचणी येत आहेत. एखादवेळी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. रस्त्यावर लहान पुलांचे बांधकाम करतांना व्यवस्थीत दबाई करण्यात न आल्याने पुलाचे पायल्यांना समांतर दबाव निर्माण होवून नाल्या पडलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर ब्रेकर तयार झाल्यासारखी अवस्था आहे.
रस्त्याचे मजबुतीकरण करतांना व डांबरीकरण करतांना तांत्रिक बाबींचे तंतोतंत पालन करण्यात आलेले दिसत नाही. त्याचबरोबर बांधकाम करतांना संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी जाणीवपूर्णक दुर्लक्ष केले. कंत्राटदाराच्या भरवस्यावर काम सोडल्याने त्याचा परिणाम आज जाणवत आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे जेततेम दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाही रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र जांभोरा ते बोरी गावा दरम्यान दिसून येत आहेत. जांभोरा ते केसलवाडा दरम्यानही रस्त्याच्या दुरावस्थेच्या खुणा दिसायल्या लागल्या आहेत. रस्त्याचे बांधकाम करतांना केसलवाडा गावातील नागरिकांनी गावातून व शेतशिवारातून सुरु असलेल्या कामाच्या गुणवत्तेसंबंधाने प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली होती. मात्र, अधिकाºयांनी प्रकरणी लक्ष दिले नाही, असा आरोप केसलवाडा येथील नागरिकांचा होता. आज जेमतेम दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतांनाच रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. अधिकारी प्रकरणी लक्ष घालून समस्या सोडवितील काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Three months after the construction of the pavement on the state road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.