बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना 5 लाखांची लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 02:40 PM2019-02-02T14:40:02+5:302019-02-02T15:03:25+5:30

बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना शनिवारी (2 फेब्रुवारी) पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

B M Kamble additional collector arrested while taking bribe in beed | बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना 5 लाखांची लाच घेताना अटक

बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना 5 लाखांची लाच घेताना अटक

Next
ठळक मुद्देबीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कांबळे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक महादेव महाकुंडे यांनाही अटक करण्यात आली.पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी पाच लाखांची मागणी केली होती.

बीड - बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांना शनिवारी (2 फेब्रुवारी) पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कांबळे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक महादेव महाकुंडे यांनाही अटक करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी पाच लाखांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत माहिती मिळली होती. कांबळे यांना पाच लाखांची लाच त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे. 



 

Web Title: B M Kamble additional collector arrested while taking bribe in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.