उन्हामुळे त्वचा झाली आहे निस्तेज?; या टिप्स घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:53 PM2019-04-02T12:53:22+5:302019-04-02T12:56:31+5:30

वातावरणातील उकाडा वाढला असून या दिवसांमध्ये त्वचेची खास काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात जास्त घाम येतो त्यामुळे त्वचेला स्किन इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

Summer skin care tips in marathi do not get scorched in heat do these easy steps to skin care in summer | उन्हामुळे त्वचा झाली आहे निस्तेज?; या टिप्स घ्या काळजी

उन्हामुळे त्वचा झाली आहे निस्तेज?; या टिप्स घ्या काळजी

googlenewsNext

(Image Care : laser-aesthetic-center.com)

वातावरणातील उकाडा वाढला असून या दिवसांमध्ये त्वचेची खास काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात जास्त घाम येतो त्यामुळे त्वचेला स्किन इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. एवढचं नाही तर थोड्या वेळासाठी जरी उन्हात गेलं तर त्वचेला मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशातच त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. अनेक ब्युटी एक्सपर्ट्स उन्हापासून त्वचेचं रक्षणं करण्यासाठी सनस्क्रिन वापरण्याचा सल्ला देतात. तसेच बाजारातही अनेक ब्युटी प्रोडक्ट्स असतात. अनेकदा त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि त्यासाठी काय करावं याबाबत अनेक लोकांच्या मनात समज-गैरसमज असतात. जाणून घेऊयात उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्याच्या काही खास टिप्स...

उन्हामध्ये जास्त फिरू नका

सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे अनेक त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच एखाद्या चांगल्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करणंही फायदेशीर ठरतं. आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला मदत होइल...

1. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिणं किंवा नॅचरल वॉटर कन्टेट असणाऱ्या पदार्थाचं सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दिवसभरात जवळपास सात ते आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. 

2. सूर्याच्या प्रखर आणि हानिकारक किरणांपासून डोळयांचा बचाव करण्यासाठी सनग्लास वेअर करणं अत्यंत उपयोगी ठरतं. खासकरून तुम्ही जर सतत बाहेर फिरणार असाल तर तुम्ही सनग्लासेसचा वापर करणं विसरू नका. 

3. ब्युटी एक्सपर्ट्सच्या सल्याने 30 एसपीएफ असणाऱ्या सनस्क्रिनचा वापर करा आणि दिवसातून तीन वेळा सनस्क्रिन अप्लाय करा.

4. संपूर्ण चेहरा स्कार्फच्या मदतीने झाकून ठेवा. तसचे हलक्या रंगांचे आणि सैल कपडे वेअर करा. 

5. एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये सहा कप दूध एकत्र करा. यामध्ये पाय बुडवून ठेवा. असं केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होते. 

6. काळजी घेऊन सुद्धा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसेच या दिवसांमध्ये कोणते प्रोडक्ट वापरावेत यासाठी तुम्ही त्यांच्याच सल्ल्याने काही प्रोडक्ट घेऊ शकता. 

7. डर्माब्रेशन सेशनमध्येही तुम्ही सहभागी होऊ शकता.  हायड्रा-फेशियल मेडी-फेशियल त्वचा उजळवण्यासाठी मदत करतं. 

8. सनबर्न स्किनसाठी अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असणाऱ्या हलक्या लोशनचा वापर करा. याचा वापर केल्याने त्वचेवर उन्हाच्या हानिकारक यूव्ही किरणांचा परिणाम होणार नाही. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Summer skin care tips in marathi do not get scorched in heat do these easy steps to skin care in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.