Navratri 2018 : आता सोडा घामामुळे मेकअप खराब होण्याची भीती; वापरा 'या' मेकअप टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:22 AM2018-10-16T11:22:58+5:302018-10-16T11:36:50+5:30

सध्या नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी दांडिया नाइट्स तर काही ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे.

Navratri 2018 : makeup tips for navratri | Navratri 2018 : आता सोडा घामामुळे मेकअप खराब होण्याची भीती; वापरा 'या' मेकअप टिप्स!

Navratri 2018 : आता सोडा घामामुळे मेकअप खराब होण्याची भीती; वापरा 'या' मेकअप टिप्स!

Next

सध्या नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी दांडिया नाइट्स तर काही ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी हटके लूक करण्याची प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग ड्रेस सिलेक्शन, डान्स प्रॅक्टिस यांसारख्या गोष्टी करण्यात येतात. पण तुम्हाला खरचं तुमचा लूक हटके करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेकअपकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास मेकअप टिप्स सांगणार आहोत. तुम्ही नवरात्रीच्या जागरणासाठी जाताना किंवा गरबा खेळण्यासाठी जाताना ट्राय करू शकता. यामुळे तुमचा मेकअप घामामुळे खराब होणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कायम राहण्यास मदत होईल.  

सर्वात आधी चेहरा स्वच्छ करा

सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करा. जर तुमची स्किन ऑयली असेल तर कॉटनच्या मदतीने अॅस्ट्रिंजट लोशन चेहऱ्यावर लावा. याव्यतिरिक्त तुम्ही चेहऱ्यावर बर्फही लावू शकता. 

प्रायमरचा वापर करा

मेकअप करताना सर्वात आधी चेहऱ्यावर प्रायमर लावा. प्रायमर लावण्यामुळे तुम्ही केलेला मेकअप चेहऱ्यावर दिर्घकाळ टिकण्यास मदत होते. 

ब्लशर लावा

जर तुम्ही मेकअपचा वापर करणार असाल तर ते थोडं लाइट आणि कमीच लावा. जर तुम्ही मेकअप करताना लाउड कलर्सचा वापर केला तर त्यामुळे तुमच्या लूकवर त्याचा परिणाम होऊ शकतो. 

फेस पावडर की फाउंडेशन 

जर तुमची स्किन नॉर्मल आहे, तर तुम्ही फाउंडेशनचा प्रयोग करा. याव्यतिरिक्त तुमची स्किन ऑयली असेल तर तुम्ही फेस पावडरचा वापर करू शकता. 

कलर कॉम्बिनेशन  

जर तुम्ही मेकअप करताना बोल्ड कलर वापरणार असाल तर लिपस्टिक थोडी लाइट कलरची लावा. जर आय मेकअपसाठी लाइट कलरचा वपर केला असेल तर लिपस्टिक बोल्ड कलर्सची लावू शकता. 

असा करा डोळ्यांना मेकअप

डोळ्यांमध्ये आय-लायनर ऐवजी आय-कॉनिक किंवा वॉटर प्रूफ काजळ लावा. तुम्ही वेगवेगळ्या रंगांचे आय शेड्सही लावू शकता. जर तुमच्या त्वचेचा रंग गोरा असेल तर पिंक, ग्रीन, पिच, ब्लू यांसारखे आय शेड्स लावू शकता. याव्यतिरिक्त तुमच्या त्वचेचा रंग सावळा असेल तर ब्राउन, गोल्ड शेड्स लावू शकता. 

लिपस्टिक 

लिपस्टिक लवण्याआधी लिप लायनरन आउटलाइन काढा आणि त्यानंतर लिपस्टिक लावा. डार्क रंगाच्या लिपस्टिकचाच वापर करा. कारण रात्री लिपस्टिकचा डार्क रंग खुलून दिसण्यास मदत होइल. 

ट्रान्सलूसेंट पावडर

मेकअप झाल्यानंतर त्याला फिनिशिंग टच देण्यासाठी ट्रान्सलूसेंट पावडरचा वापर करा. हीी पावडर फक्त लूक मॅटीफाय करण्यासाठीच नाही तर घामामुळे तुमचा मेकअप खराब होण्यापासूनही बचाव करेल.

Web Title: Navratri 2018 : makeup tips for navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.