उन्हाळ्यात स्कीनसाठी लोशनची निवड कशी कराल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:06 PM2019-05-08T13:06:53+5:302019-05-08T13:11:31+5:30

थंडीच्या दिवसात सगळेजण लोशन पासून ते फेसक्रिमपर्यंत सर्वच गोष्टी लावण्याची आठवण ठेवतात. पण उन्हाळा सुरू होताच लोक हे विसरून जातात.

How to choose a lot of lotion in the summer? | उन्हाळ्यात स्कीनसाठी लोशनची निवड कशी कराल? 

उन्हाळ्यात स्कीनसाठी लोशनची निवड कशी कराल? 

googlenewsNext

(Image Credit : SheKnows)

थंडीच्या दिवसात सगळेजण लोशन पासून ते फेसक्रिमपर्यंत सर्वच गोष्टी लावण्याची आठवण ठेवतात. पण उन्हाळा सुरू होताच लोक हे विसरून जातात. कारण त्यांना लोशन किंवा फेसक्रीममुळे येणारा घाम नको असतो. पण असं करणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. उन्हाळ्यात आपल्या त्वचेला मॉयश्चरची गरज असते. मॉयश्चरची कमतरता असल्याने त्वचेचं उन्हात नुकसान होतं. अशात शरीरावर लोशन लावणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे या दिवसात लोशनची निवड कशी करावी याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

नॉर्मल स्कीन

(Image Credit : arlene nguyen)

नॉर्मल स्कीन असलेल्या लोकांवर तर तसे सर्वच लोशन काम करतात. पण जास्त थिन लोशनचा वापर टाळावा. या लोशनमुळे शरीराववर जास्त घाम येऊ लागतो. त्यामुळे स्कीन चिकट होते. अशात अशा लोशनची निवड करा ज्याने स्कीनची सुरक्षा होईल. बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

ऑयली स्कीन

(Image Credit : ExpatWoman)

उन्हाळ्यात सर्वात जास्त समस्या ऑयली स्कीन असलेल्यांची होते. कारण चुकीचं लोशन किंवा मॉइश्चरायजर निवडलं तर स्कीनवर फार जास्त तेल दिसतं आणि त्वचा चिकट वाटते. तसेच ऑयली स्कीन असलेल्यांना घामही अधिक येतो. त्यामुळे बरं होईल की, त्यांनी वॉटर बेस्ड लोशनची निवड करावी. तुम्ही अॅलोव्हेरा बेस्ड लोशनचीही निवड करू शकता. याने स्कीनची सुरक्षा तर होईलच, सोबतच स्कीन मुलायमही होईल. 

ड्राय स्कीन

(Image Credit : Inside Outer Beauty)

ड्राय स्कीन असलेल्यांनी जर लोशन लावलं नाही तर त्यांची स्कीन डॅमेज होण्याचा धोका असतो. असं यासाठी होतं कारण त्यांची स्कीन आधीच ड्राय असते आणि त्यात उन्हामुळे स्कीनवरील मॉइश्चरही शोषलं जातं. याने स्कीन टॅनची शक्यता अधिक असते. त्यामुळे ड्राय स्कीन असलेल्या लोकांनी थिकनेस जास्त असलेल्या लोशनची निवड करावी. 

Web Title: How to choose a lot of lotion in the summer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.