दूर करण्यासाठी घामामुळे डोक्याला होणारी खाज 'हे' ३ उपाय करा आजच्या आज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 10:18 AM2019-04-13T10:18:00+5:302019-04-13T10:22:05+5:30

सद्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आपण आपल्या शरीराची काळजी तर घेतो, पण अनेकदा केसांची किंवा डोक्याची काळजी घेणे विसरतो.

Facing itching problem in scalp try these useful home remedies | दूर करण्यासाठी घामामुळे डोक्याला होणारी खाज 'हे' ३ उपाय करा आजच्या आज!

दूर करण्यासाठी घामामुळे डोक्याला होणारी खाज 'हे' ३ उपाय करा आजच्या आज!

Next

सद्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये आपण आपल्या शरीराची काळजी तर घेतो, पण अनेकदा केसांची किंवा डोक्याची काळजी घेणे विसरतो. सध्या उकाडा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे त्वचा आणि केसांचं फार नुकसान होतं. या उकाड्यात शरीरावर घाम आला तर आपण तो पुसून टाकतो, पण डोक्यावर येणारा घाम तसाच राहतो. त्यामुळे केसांमध्ये धुळ-माती जमा होते आणि त्यामुळेच केसांची दुर्गंधीही येऊ लागते. अशात जेवढी काळजी आपण शरीराची घेतो तेवढीच डोक्याची आणि केसांचीही घेतली पाहिजे. चला जाणून घेऊ अशाच काही टिप्स ज्यांच्या मदतीने डोक्याच्या त्वचेची समस्या दूर होईल. 

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामध्ये अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल असे दोन्ही गुण असतात. याने डोक्याच्या त्वचेत येणारी खास दूर करण्यास मदत मिळते. यासाठी एका बाऊलमध्ये थोडं पाणी आणि २ ते ३ चमचे बेकिंग सोडा मिश्रीत करा. याची घट्ट पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. नंतर शॅम्पूने केस धुवावे. 

ऑलिव ऑइल

ऑलिव ऑइलमध्येही अ‍ॅंटी-इनफ्लेमेटरी आणि स्कीन प्रोटेक्टिंग एजंट्स असतात, जे उन्हाळ्यात डोक्याच्या त्वचेवर येणारी खाज आणि इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतं. मायक्रोवेव्हमध्ये कमीत कमी ७ सेकंदासाठी ऑलिव ऑइल गरम करा. हे ऑइल डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना लावा व रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी केस शॅम्पूने चांगले धुवा. याचा चांगला फायदा बघण्यासाठी आठवड्यातून दोनदा याचा वापर करा.

अ‍ॅलोव्हेरा जेल

अ‍ॅलोव्हेरा जेल एका नैसर्गिक मॉइश्चरायजर आहे. याच्या अ‍ॅंटी-मायक्रोबियल गुणांमुळे डोक्याच्या त्वचेवर येणारी खाज दूर होते. यासाठी ऑर्गॅनिक जेल घ्या. हे जेल थेट डोक्याच्या त्वचेला आणि केसांना लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोम पाण्याने डोकं धुवा.

Web Title: Facing itching problem in scalp try these useful home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.