Makeup Tips : मेकअप करताना प्राइमर, सीरम, फाउंडेशन, कंसीलरपैकी सर्वात आधी काय लावाल? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 11:35 AM2018-11-10T11:35:39+5:302018-11-10T11:36:54+5:30

अनेक महिला आणि तरूणी सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. जवळपास सर्वच महिलांना कमी अधिक प्रमाणात मेकअप करायला आवडतं. अनेक मुली आपली त्वचा, चेहरा आणि आपल्या त्वचेचा रंग लक्षात घेऊन व्यवस्थित मेकअप करतात.

easy makeup tips simple guide to apply makeup base in steps by using serum primer concealer | Makeup Tips : मेकअप करताना प्राइमर, सीरम, फाउंडेशन, कंसीलरपैकी सर्वात आधी काय लावाल? जाणून घ्या!

Makeup Tips : मेकअप करताना प्राइमर, सीरम, फाउंडेशन, कंसीलरपैकी सर्वात आधी काय लावाल? जाणून घ्या!

googlenewsNext

अनेक महिला आणि तरूणी सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. जवळपास सर्वच महिलांना कमी अधिक प्रमाणात मेकअप करायला आवडतं. अनेक मुली आपली त्वचा, चेहरा आणि आपल्या त्वचेचा रंग लक्षात घेऊन व्यवस्थित मेकअप करतात. परंतु यामध्ये अनेक मुली अशाही आहेत ज्यांना मेकअप करायला आवडतं पण, त्यांना व्यवस्थित मेकअप करणं शक्य होत नाही. मेकअप करण्यासाठी वापरण्यात येणारं फाउंडेशन, पावडर, सीरम, कंसीलर यांपैकी कोणतं प्रोडक्ट, कधी आणि कसं वापरावं याबाबत त्या गोंधळून जातात. 

मुख्यतः अनेक महिलांकडून मेकअप करताना होणाऱ्या या चुकांना दोन मुख्य कारणं जबाबदर ठरतात. पहिलं म्हणजे मेकअप करताना मेकअप प्रोडक्ट्सचा योग्य क्रम माहीत नसणं आणि दुसरं म्हणजे मेकअपच्या प्रोडक्ट्सचा योग्य पद्धतीने वापर न करता येणं. आज आम्ही तुम्हाला मेकअप करण्याचा आणि मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करण्याचा योग्य क्रम सांगणार आहोत. जाणून घेऊयात मेकअप करताना सर्वात आधी चेहऱ्यावर कोणतं प्रोडक्ट अल्पाय करावं आणि हे प्रोडक्ट्स वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी त्याबाबत...

पॉप्युलर मेकअप प्रोडक्ट 

अनेक मुलींना बेस मेकअपमध्ये फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर या दोन प्रोडक्ट्सबाबतच माहीती असते. परंतु याव्यतिरिक्त सीरम, प्राइमर, कंसीलर यांसारखे प्रोडक्ट्सही असतात. ज्यांचा बेस मेकअपमध्ये वापर करण्यात येतो. त्यामुळे तुम्ही केलेला मेकअप काही तासांपर्यंत व्यवस्थित राहण्यास मदत होते. 

सर्वात आधी सीरम

जर तुमची स्किन ऑयली असेल आणि मेकअप केल्यानंतर काही वेळातच तुमचा चेहरा मेकअपमुळे खराब होत असेल तर मेकअप करण्याआधी सीरमचा वापर करा. सीरम विकत घेताना सर्वात आधी तुमचा स्किन टाइप लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर सीरमचे 3 ते 4 थेंब हातावर घ्या आणि टॅप करत चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर ज्या जागी सर्वात जास्त तेलकटपणा जाणवतो त्या भागात सीरम लावा. 

प्राइमर

प्राइमर म्हणजे मेकअपमधील सर्वात पहिलं आणि मेकअपचा बेस व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असलेलं कॉस्मॅटिक प्रोडक्ट. यामुळे मेकअप बिघडत नाही. प्राइमर हाताच्या बोटांच्या सहाय्याने चेहऱ्याच्या फक्त त्या भागात लाव ज्याभागात स्किन पोर्स जास्त आहेत. हे क्रिमप्रमाणे संपूर्ण चेहऱ्यावर लावण्याची गरज नसते. 

कंसीलर

चेहऱ्यावर आधी कंसीलर लावतात की, फाउंडेशन यामध्ये अनेक महिला गोंधळून जातात. त्यामध्ये गोंधळून ज्याण्याची गरज नाही. कारण यातं उत्तर फार सोपं आहे, चेहऱ्यावर सर्वात आधी कंसीलर लावतात. कारण कंसीलर चेहऱ्यावरीलडार्क सर्कल आणि डार्क स्पॉट्स कव्हर करून फाउंडेशनचं काम करतं. त्यामुळे चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्याआधीच इव्हन टोन मिळण्यास मदत होते. म्हणून कंसीलर डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावरील सर्व डार्क स्पॉट असलेल्या भागामध्ये लावा. 

फाउंडेशन

कंसीलर लावून झाल्यानंतर आता चेहऱ्यावर फाउंडेशन लावा. फाउंडेशन निवडताना व्यवस्थित आपला स्किन टोननुसार निवडा. चुकीचं फाउंडेशनमुळे तुमचा संपूर्ण मेकअप बिघडू शकतो. जर तुमच्याकडे ड्राय फाउंडेशन असेल तर ते लावण्यासाठी स्पंजचा वापर करा. पण जर फाउंडेशन लिक्वड स्वरूपातील असेल तर ब्रशच्या सहाय्याने अप्लाय करा.

पावडर

जर तुमची स्किन जास्तच ऑयली असले तर मेकअपचा बेस लवल्यानंतर चेहऱ्यावर ब्रशच्या सहाय्याने कॉम्पॅक्ट पावडर नक्की वापरा. त्यामुळे वेगळा लूक मिळतो आणि चेहऱ्यावर मेकअप टिकून राहण्यास मदत मिळते. 

Web Title: easy makeup tips simple guide to apply makeup base in steps by using serum primer concealer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.