पायांच्या दुर्गंधीने हैराण असाल तर करा 'हा' उपाय, काही मिनिटात होईल फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 12:54 PM2019-03-09T12:54:24+5:302019-03-09T12:56:36+5:30

उन्हाळ्याला आता सुरूवात होणार आहे. उन्हाळा म्हटला की, चिपचिपणारा घाम आणि त्यामुळे येणारी शरीराची दुर्गंधी.

Easy home remedy to get rid of feet odour naturally | पायांच्या दुर्गंधीने हैराण असाल तर करा 'हा' उपाय, काही मिनिटात होईल फायदा!

पायांच्या दुर्गंधीने हैराण असाल तर करा 'हा' उपाय, काही मिनिटात होईल फायदा!

Next

उन्हाळ्याला आता सुरूवात होणार आहे. उन्हाळा म्हटला की, चिपचिपणारा घाम आणि त्यामुळे येणारी शरीराची दुर्गंधी. अनेकजण शूज वापरत असल्याने पायांचा आणि मोज्यांचाही असह्य वास येतो. अशावेळी शूज काढून कुणाजवळ बसणंही कठीण होऊन जातं. लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो म्हणून अनेकजण हैराणही होतात. मात्र ही समस्य दूर काही फार कठीण काम नाही. 

पायांची दुर्गंधी का येते?

सर्वातआधी जाणून घेऊ पायाची दुर्गंधी येण्याचं कारण. आपल्या पायाच्या त्वचेमध्ये 2500000 ग्लॅंड असतात, ज्यामुळे घाम तयार होतो. सर्वच ग्लॅंडमधून वेगवेगळ्या दुर्गंधीचा घाम निघतो. या ग्लॅंड्सना जर योग्य तापमान आणि हवा मिळाली नाही तर दुर्गंधी असलेला घाम निघतो. 

त्यासोबतच पायांमधून एक वेगळ्याप्रकारचा बॅक्टेरिया सुद्धा निघतो, या बॅक्टेरियाला टाइट शूजमुळे शिफ्ट होण्याची संधी मिळत नसेल तर हे पायांना चिकटतात. हे बॅक्टेरिया पायांना चिकटल्यावर चिकटपणा येतो आणि याने दुर्गंधी येते. 

पायांची दुर्गंधी येण्याची कॉमन कारणे

- सिंथेटिक शूज - याप्रकारचे शूज वापरल्याने पायांना घाम अधिक येतो आणि घाम सुकला नाही तर पायांची दुर्गंधी येऊ लागते. 

- फार जास्त वेळेसाठी टाइट शूज वापरणे - तासंतास जर टाइट शूज पायातच राहिले तर पायांची डेड स्कीन आणि बॅक्टेरिया पायांना चिकटतो. अशात पायांची दुर्गंधी येऊ लागते. 

- हार्मोन्स - फार कमी लोकांना हे माहीत आहे की, हार्मोन्सच्या प्रकारामुळेही पायांची दुर्गंधी येते. हार्मोन्सच्या कारणांमुळे काही लोकांना प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो आणि त्यांच्या पायांची दुर्गंधी येते.

- तणाव - अधिक तणावामुळेही दुर्गंधी असलेला घाम येतो आणि हा घाम पायांना आला तर अधिक अडचण होते. 

कशी दूर कराल दुर्गंधी?

पायांच्या दुर्गंधीची समस्या तुम्हाला दूर करायची असेल तर व्हिनेगरचा वापर करा. व्हिनेगर सहजपणे किचनमध्ये मिळतं. याने पायांची दुर्गंधी दूर करण्यास मदत मिळते. 

यासाठी तुम्हाला इतकंच करावं लागेल की, एका छोट्या बकेटीमध्ये किंवा टबमध्ये पाय भिजतील इतकं पाणी घ्या. यात ३ ते ४ थेंब चमचे व्हिनेगर टाका. पाणी कोमट असेल तरी चालेल. व्हिनेगर टाकल्यावर पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय ठेवून बसा. 

नंतर पाय स्वच्छ टॉवेलने कोरडे करा. हा उपाय आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा करा. काही आठवडे हा उपाय केल्याने पायांच्या दुर्गंधीपासून तुम्हाला सुटका मिळेल. 

कसं करतं काम?

व्हिनेगरमध्ये अॅंटीमायक्रो बियल तत्व असतात. याने घाम आणि त्वचेमधील बॅक्टेरिया दूर करण्यास मदत होते. याचे काही साइड इफेक्टही नसतात. कारण हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे. 
 

Web Title: Easy home remedy to get rid of feet odour naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.