या ६ प्रकारे बदामांचा वापर करुन चेहरा करा चमकदार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 11:04 AM2018-10-15T11:04:21+5:302018-10-15T11:05:59+5:30

चेहऱ्यावर सतत चमक कायम ठेवणे कठीण काम असतं. महिलांना या गोष्टीची प्रत्येक ऋतूमध्ये काळजी घ्यावी लागते.

6 best almond face packs glowing skin overnight | या ६ प्रकारे बदामांचा वापर करुन चेहरा करा चमकदार! 

या ६ प्रकारे बदामांचा वापर करुन चेहरा करा चमकदार! 

Next

चेहऱ्यावर सतत चमक कायम ठेवणे कठीण काम असतं. महिलांना या गोष्टीची प्रत्येक ऋतूमध्ये काळजी घ्यावी लागते. आता तर लग्न-समारंभाना सुरुवात होणार आहे त्यामुळे अशात चेहऱ्याची अधिक काळजी घ्यावी लागते. पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावर मेकअप तर केला जाऊ शकतो. पण नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी घरीच काही खास उपाय कामात येतात. 

बदाम त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण बदामाचा उपयोग कसा करावा हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बदामाच्या फेस पॅकचा वापर केला असेल तर याचे फायदे तुम्हाला माहीत असतीलच. पण काय तुम्हाला बदामाचे फेस पॅक कसे तयार करायचे हे माहीत आहे? जर नसेल तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. 

१) एक चमचा बदामाचं पावडर आणि दोन चमचे कच्च दूध मिश्रित करुन चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा. याने चेहरा स्वच्छ होऊन लगेच चेहरा ग्लो करायला लागेल. 

२) बदाम बारीक करुन त्यात लिंबाचा रस टाका. आता ही पेस्ट डोळ्यांचा भाग सोडून पूर्ण चेहऱ्यावर लावा आणि मानेवर लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा. त्यानंतर लोशन लावायला विसरु नका.

३) १ चमचा मुलतानी माती, काही थेंब गुलाबजल आणि २ चमचे बदाम पावडर मिश्रित करा. हे १० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवून घ्या. ऑयली स्किनसाठी हा फेस पॅक फायदेशीर आहे. 

४) ४ ते ५ बदाम बारीक करुन त्यात मध मिश्रित करा. हा पॅक १० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. लगेच चमकदार चेहरा हवा असेल तर हा पॅक फार फायदेशीर आहे. 

५) बारीक केलेल्या बदामामध्ये नारळाचं दूध मिश्रित करुन चेहऱ्यावर लावा आणि चेहरा कोरडा झाल्यावर पाण्याने धुवून घ्या. हा फेस पॅक तुमचा स्किन टोन हलका करण्यास मदत करतो. सोबतच याने तुम्हाला चमकदार त्वचाही मिळते. 

६) बदाम भिजवून ठेवा आणि त्यानंतर बारीक करा. आता यात पपईचा गर मिश्रित करा आणि चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. याने चमकदार त्वचा मिळेल आणि पिंपल्स, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स दूर होतात.
 

Web Title: 6 best almond face packs glowing skin overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.