सायना नेहवाल, के. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:59 AM2019-03-08T05:59:03+5:302019-03-08T05:59:12+5:30

सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Saina Nehwal, K. Srikanth in the quarter-finals | सायना नेहवाल, के. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

सायना नेहवाल, के. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Next

बर्मिंघम : सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाने डेन्मार्कच्या होमार्कला तर श्रीकांतने जोनाथन ख्रिस्तीला पराभूत केले.
आॅलिम्पिकची माजी कांस्य विजेती सायनाने लाइन होमार्क जॉर्सफेल्टविरुद्ध रोमहर्षक सामन्यात विजय संपादन केला. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या सायनाने शानदार कामगिरी करत हा सामना ८-२१,२१-१६,२१-१३ असा विजय मिळवला. सातव्या मानांकित श्रीकांतने आशियाई चॅम्पियन जोनाथन ख्रिस्ती याला २१-१७,११-२१,२१-१२ असे पराभूत केले.
पुढील फेरीत सायनाचा सामना चीनी तैपैच्या ताइ ज्यु यिंग हिच्याशी होण्याची शक्यता आहे. ताइ ज्यु यिंगने मागील १२ सामन्यात सायनाला पराभूत केलेले आहे . श्रीकांतचा सामना जपानच्या केंटो मोमोटा याच्याशी होणार आहे.
तत्पुर्वी सायनाने बुधवारी उशिरा रात्री स्कॉटलंडची ख्रिस्टी गिलमोर हिचा ३५ मिनिटात २१-१७,२१-१८ ने पराभव केला. श्रीकांतने फ्रान्सचा ब्राइस लेवरडेज याच्यावर एकतर्फी लढतीत २१-१३,२१-११ ने विजय नोंदविला.
बी साईप्रणीतला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. हाँगकाँगच्या लोंग एंगस् याने त्याला १२-२१, १७-२१ असे पराभूत केले. समीर वर्मा याने पहिला गेम जिंकल्यानंतरही माजी विश्व विजेता आणि जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू व्हिक्टर एक्सलसन याला २१-१६,१८-२१,१४-२१ असे पराभूत केले.
अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी या जोडीलादेखील शिहो तनाका-कोहारू योनेमोतो या जपानच्या सातव्या मानांकित जोडीकडून २१-२३, १७-२१ ने पराभव पत्करावा लागला.
सिक्की रेड्डी आणि जखमेतून सावरलेला प्रणव जेरी चोप्रा यांच्या मिश्र जोडीला चांग टेक चिग-विग युंग या हाँगकाँगच्या जोडीकडून २१-२३, १७-२१ ने पराभवाचा धक्कका बसला. मनू अत्री-सुमित रेड्डी यांची जोडी चीनचे ओयू शुयान्यी-रेन शियांग्यू यांच्याकडून १९-२१, २१-१६, १४-२१ ने पराभूत झाली.
>नियमित सुपर सीरिज स्पर्धांच्या तुलनेत आॅल इंग्लंडमधील सामने अधिक आव्हानात्मक असतात. सर्वजण चषक जिंकू इच्छितात; पण सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावाच लागतो. ’’
- सायना नेहवाल

Web Title: Saina Nehwal, K. Srikanth in the quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.