भारतामध्ये चांगले प्रशिक्षक घडविण्याची गरज- पुलेल्ला गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 08:55 PM2017-12-06T20:55:49+5:302017-12-06T20:58:47+5:30

मुंबई : आज भारतामध्ये चांगले प्रशिक्षक घडविण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे असे म्हटलेल्या प्रकाश पदुकोण यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.

Need to make good coaches in India - Pullea Gopichand | भारतामध्ये चांगले प्रशिक्षक घडविण्याची गरज- पुलेल्ला गोपीचंद

भारतामध्ये चांगले प्रशिक्षक घडविण्याची गरज- पुलेल्ला गोपीचंद

Next

मुंबई : आज भारतामध्ये चांगले प्रशिक्षक घडविण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे असे म्हटलेल्या प्रकाश पदुकोण यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. भारतीय बॅडमिंटनच्या प्रगतीसाठी चांगले प्रशिक्षक घडने अत्यावश्यक आहे, असे भारताचा राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

बुधवारी मुंबईत पुलेल्ला गोपीचंद अकादमीने आघाडीच्या बँकेसह यंग चॅम्प्स या नावाने अनोख्या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमअंतर्गत गोपीचंद अकादमी देशभरातील १० वर्षांखालील गुणवान खेळाडूंचा शोध घेणार आहे. या उपक्रमाची घोषणा केल्यानंतर गोपीचंदने आपले मत मांडले.

काही दिवसांपूर्वी पदुकोण यांनी मुंबईत म्हटले होते की, बॅडमिंटनमध्ये प्रगती करण्यासाठी भारताला प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीर मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. याविषयी विचारले असता गोपीचंद म्हणाले की, मी या मताशी पूर्णपणे सहमत आहे. केवळ प्रशिक्षक प्रशिक्षणावर भर न देता प्रशिक्षकांचा सन्मान, त्यांचे मानधन आणि प्रशिक्षकांच्या इतर गरजा यावरही गंभीर विचार केला पाहिजे. शिवाय ही प्रक्रीया दीर्घकालीन असल्याने आपल्याला चांगले खेळाडू घडवायचे असतील, तर त्याआधी चांगले प्रशिक्षक घडविणे आवश्यक आहे.

यंदाचे वर्ष भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरल्याचे सांगताना गोपीचंद म्हणाले की, माझ्या मते सर्वच खेळाडूंनी यंदा चांगली कामगिरी केली. जागतिक अजिंक्यपद किंवा सुपर सिरीजसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी छाप पाडली. गतवर्ष पी. व्ही. सिंधूने गाजवले, तर यंदाच्या वर्षी पुरुष खेळाडूंनी वर्चस्व राखले. यंदा किदाम्बी श्रीकांतने चार सुपर सिरीज जेतेपद पटकावण्याची अद्भुत कामगिरी केली आहे. आगामी दुबई ओपन सिरीज स्पर्धेतही भारतीयांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
.......................................
गोपीचंद अकादमी यंग चॅम्प्स उपक्रमाची घोषणा केली असून याअंतर्गत देशभरातील १० वर्षांखालील खेळाडूंची गुणवत्ता शोधण्यात येणार आहे. या शोध मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुक पालकांनी आपल्या मुला-मुलींचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर २८ डिसेंबरपर्यंत अपलोड करण्याचे आवाहन गोपीचंद यांनी केले आहे. व्हिडीओद्वारे युवा खेळाडूंमधील क्षमता पाहून निवडक १०-१५ खेळाडूंना हैदराबाद येथे गोपीचंद अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी बोलाविण्यात येईल.

Web Title: Need to make good coaches in India - Pullea Gopichand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.