योग गुरु बाबा रामदेव यांनी जी कार चालवली, तिची किंमत माहीते? जाणून थक्क व्हाल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:46 PM2023-07-26T15:46:43+5:302023-07-26T15:52:07+5:30

कंपनीने ही कार फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात लॉन्च केली असून तिची डिलिव्हरी नुकतीच सुरू झाली आहे.

Do you know the price of the car that yoga guru Baba Ramdev drives You will be surprised to know | योग गुरु बाबा रामदेव यांनी जी कार चालवली, तिची किंमत माहीते? जाणून थक्क व्हाल...!

योग गुरु बाबा रामदेव यांनी जी कार चालवली, तिची किंमत माहीते? जाणून थक्क व्हाल...!

googlenewsNext

सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यात ते नवी 'लँड रोव्हर डिफेन्डर 130' (Land Rover Defender 130) कार चलवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील हरिद्वारचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओवर लोक आपल्या  प्रतिक्रियाही देत आहेत. 

या व्हिडिओत, बाबा रामदेव कार चालविण्यापूर्वी तिची पाहणी करत आहेत. मात्र ही कार बाबा रामदेव यांनी खरेदी केली आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीने ही कार फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात लॉन्च केली असून तिची डिलिव्हरी नुकतीच सुरू झाली आहे.

किंमत जाणून थक्क व्हाल -
योग गुरु बाबा रामदेव जी नवी 'लँड रोव्हर डिफेन्डर 130' (Land Rover Defender 130) चालवताना दिसत आहेत. तिची किंमत कोटीच्या घरात आहे. हिची एक्स-शोरूम प्राइस 1.30 कोटी ते 1.41 कोटी रुपयांपर्यंत आहे. योग गुरु बाबा रामदेव हे कोट्यवधी रुपयांच्या सपत्तीचे मालक आहेत. माध्यमांतील वत्तांनुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वीच एक महिंद्रा XUV700 SUV खरेदी केली होती. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

लोकांना पसंत आला बाबा रामदेव यांचा अंदाज - 
बाबा रामदेवांच्या या व्हडिओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. इंस्टाग्रामवर बाबा रामदेवांचे 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करत बाबा रामदेव यांनी कार गुरु व्हावे, असे म्हणत आहेत. तर अनेक जण या कारच्या प्रेमात पडले आहेत.

Web Title: Do you know the price of the car that yoga guru Baba Ramdev drives You will be surprised to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.