देशातील पहिली स्वदेशी अॅन्ड्रॉईड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, मोबाइलपेक्षा लवकर होते चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 11:07 IST2019-01-02T10:57:49+5:302019-01-02T11:07:49+5:30
देशातील एका कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर मोबाइलपेक्षा कमी वेळात 80 टक्के चार्ज होते असा दावा स्कूटर तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे.

देशातील पहिली स्वदेशी अॅन्ड्रॉईड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, मोबाइलपेक्षा लवकर होते चार्ज
नवी दिल्ली - जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आले आहे. 2019 या वर्षात सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. विजेवर चालणाऱ्या दुचाकी गाड्या लाँच करण्याची तयारी अनेक कंपन्यांनी सुरू केली आहे. देशातील एका कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर मोबाइलपेक्षा कमी वेळात 80 टक्के चार्ज होते असा दावा स्कूटर तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे. स्कूटरमध्ये अॅन्ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टम आणि बॅक गिअरसारख्या काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत.
आथर एनर्जी या कंपनीने ही स्कूटर तयार केली असून स्कूटर पूर्णपणे देशातच तयार करण्यात आली आहे. कंपनीने Ather S340 आणि S450 या दोन स्कूटर्स लाँच केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर्सची वैशिष्ट्ये म्हणजे या मोबाइलपेक्षा लवकर चार्ज होतात. या दोन्ही स्कूटर्सची बॅटरी 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते.
कंपनीने स्कूटर्समध्ये आवर्सची लीथियम ऑयनची बॅटरी देण्यात आली आहे. ती 50 हजार किलोमीटरपर्यंत चालू शकते. या बॅटरीला IP67 कडून स्वीकृती मिळाली आहे. स्कूटरची बॅटरी फुल चार्जिंग झाल्यानंतर ही स्कूटर 75 किलोमीटर मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे. तसेच 3.9 सेकंदात ही 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. आथर 450 या स्कूटरची किंमत 1 लाख 24 हजार 750 रुपये तर आथर 340 या स्कूटरची किंमत 1 लाख 9 हजार 750 रुपये आहे.