अट्टल चोरट्याकडून ट्रकभर मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:57 IST2017-10-28T00:57:36+5:302017-10-28T00:57:42+5:30

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीरनगर येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपी हबीब अहमद हबीब हुसेन या आरोपीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ या आरोपीच्या घरातून पोलिसांनी जवळपास पंधरा लाख रुपयांचा ट्रकभर मुद्देमाल जप्त केला आहे़

Truck seized from truck by unidentified thieves | अट्टल चोरट्याकडून ट्रकभर मुद्देमाल जप्त

अट्टल चोरट्याकडून ट्रकभर मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीरनगर येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपी हबीब अहमद हबीब हुसेन या आरोपीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ या आरोपीच्या घरातून पोलिसांनी जवळपास पंधरा लाख रुपयांचा ट्रकभर मुद्देमाल जप्त केला आहे़
विमानतळ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने पीरनगर येथील चोरीच्या प्रकरणात सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला पकडले होते़ त्यासाठी सायबर पथकाची मदत घेण्यात आली़ चौकशीसाठी आरोपीला मुख्यालयात नेले असताना, आरोपीने गळ्याला काच लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यानंतर आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़
या आरोपीच्या देगलूर नाका परिसरातील घराची पोलिसांनी झडती घेतली असता, पोलिसांना ट्रकभर मुद्देमाल मिळाला़ त्यात १० लॅपटॉप, ६ एलसीडी, १० डिजिटल कॅमेरे, २७ मोबाईल, ५९ घड्याळ, १२ गॅस सिलेंडर, १० कॅमेरे, १ चांदीची प्लेट, १ सोन्याची चैन, १ चांदीचा ग्लास, २ सोन्याच्या अंगठ्या, २ फ्रिज आदी साहित्यांचा समावेश आहे़ आरोपी सराईत चोरटा असून त्याच्याकडून चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे़

Web Title: Truck seized from truck by unidentified thieves