राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या राधिका, मोहित, स्वरूपा यांना सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:30 IST2017-11-24T00:28:10+5:302017-11-24T00:30:37+5:30

अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबाद विभागाच्या राधिका शर्मा, मोहित सिंग व स्वरूपा कोठावळे यांनी आपापल्या वयोगट व वजन गटात सुवर्णपदकांची कमाई केली.

Radhika, Mohit, Swaroop and Aurangabad gold medals in state-level Taekwondo | राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या राधिका, मोहित, स्वरूपा यांना सुवर्ण

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या राधिका, मोहित, स्वरूपा यांना सुवर्ण

औरंगाबाद : अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबाद विभागाच्या राधिका शर्मा, मोहित सिंग व स्वरूपा कोठावळे यांनी आपापल्या वयोगट व वजन गटात सुवर्णपदकांची कमाई केली. जयेश पठारे, आदित्य मनगटे, प्रतिमा एखंडे, निशी बडजाते, खुशी बडजाते, कुणाल जावळे, सोमेश नंदगवळी यांनी आपापल्या वजन गटात रौप्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे उदयोन्मुख खेळाडू श्रेया पराडकर, शिवानी नागलगोळ, हर्षल भुईगळ, अश्लेषा पाटील, स्वयंभू गुप्ता, मनमीरासिंग बिसल, पायल शेजवळ, सचिन मगरे यांनी कास्यपदकांची कमाई केली. या संघासोबत प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून अमोल थोरात, आशिष बनकर, अंतरा हिरे, शरद पवार, प्रतीक जांभूळकर, गणेश चव्हाण, प्रीती खरात गेले होते. पंच म्हणून प्रवीण वाघ यांनी काम पाहिले. या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक व राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष के. डी. शार्दूल, सचिव लता कलवार, सदस्य संतोष सोनवणे, शरद तिवारी, राजू जाधव, गजेंद्र गवंडर, डोनिका रूपारेल, योगेश विश्वासराव, चंद्रशेखर जेऊरकर, अविनाश नलावडे, सागर वाघ, धनंजय बागल, विशाल सुरडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, क्रीडा अधिकारी गोकूळ तांदळे, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Radhika, Mohit, Swaroop and Aurangabad gold medals in state-level Taekwondo