सिडको येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पुष्पलता दहिवाळ यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:55 IST2018-06-21T14:00:34+5:302018-06-21T14:55:06+5:30
विद्युत गिझर लावत असताना झालेल्या स्फोटात पुष्पलता दहिवाळ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिडको येथील आविष्कार कॉलनीत येथे आज सकाळी ६. ३० वाजेच्या दरम्यान घडली.

सिडको येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत पुष्पलता दहिवाळ यांचा मृत्यू
औरंगाबाद : विद्युत गिझर लावत असताना झालेल्या स्फोटात पुष्पलता दहिवाळ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिडको येथील आविष्कार कॉलनीत येथे आज सकाळी ६. ३० वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्री श्री १००८ महामंडळेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाळ हे सिडको येथील आविष्कार कॉलनी येथे राहतात. आज सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान त्यांची पत्नी पुष्पलता या बाथरूममधील विद्युत गिझर लावत होत्या, तेव्हा गिझरमध्ये अचानक स्फोट झाला. यात त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि त्या गंभीर भाजल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांना शासकीय रुग्णालय घाटी येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांचा शहरात मोठा भक्त परिवारात असून पुष्पलता या गुरू आई म्हणून परिचीत होत्या .