पत्नीची छेड काढणाºया तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:06 IST2017-09-02T01:06:24+5:302017-09-02T01:06:24+5:30

पत्नीची छेड काढल्याच्या कारणावरून १९ वर्षीय तरुणाला घराबाहेर बोलावून नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची थरारक घटना गुरुवारी रात्री चिंचोळी येथील तोळानाईक तांडा (ता. औरंगाबाद) येथे घडली

 The cruel assassination of the young man | पत्नीची छेड काढणाºया तरुणाची निर्घृण हत्या

पत्नीची छेड काढणाºया तरुणाची निर्घृण हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पत्नीची छेड काढल्याच्या कारणावरून १९ वर्षीय तरुणाला घराबाहेर बोलावून नेत त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची थरारक घटना गुरुवारी रात्री चिंचोळी येथील तोळानाईक तांडा (ता. औरंगाबाद) येथे घडली. हत्या करून पसार झालेल्या आरोपीला चिकलठाणा पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकण्यात यश आले.
रवींद्र कल्याण जाधव (१९, रा. तोळानाईक तांडा, चिंचोळी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रामेश्वर शिवलाल पवार (२१, रा. तोळानाईक तांडा) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मयत हे परस्परांचे नातेवाईक आहेत.

Web Title:  The cruel assassination of the young man