सारा वैभवमधील पाच घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:02 IST2018-09-13T01:02:16+5:302018-09-13T01:02:28+5:30

पोळा सण आणि अन्य कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या जटवाडा रस्त्यावरील सारा वैभव येथील पाच कुटुंबियांच्या घरांचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे बुधवारी समोर आले.

5 housebrakings in Sara Vaibhav | सारा वैभवमधील पाच घरे फोडली

सारा वैभवमधील पाच घरे फोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोळा सण आणि अन्य कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या जटवाडा रस्त्यावरील सारा वैभव येथील पाच कुटुंबियांच्या घरांचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे बुधवारी समोर आले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले. बेगमपुरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.
शिवानंद रामचंद्र शेळके गावी गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. चोरट्यांनी लोखंडी कपाटातील पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार घेऊन चोरटे पसार झाले. याच कॉलनीतील अभिषेक सुभाष देशपांडे हे मंगळवारी सहपरिवार बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी दाराचा कडीकोंडा तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले. मुुकेश इधाटे हे सावंगी येथे सासुरवाडीला गेले होते. चोरट्यांनी बंद घर फोडून कपाटातील सात ते आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि काही चांदीच्या वस्तू, रोख दहा हजार रुपये चोरून नेले. कैलास पालोदकर यांचे घरही चोरट्यांनी रात्री फोडल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले.

Web Title: 5 housebrakings in Sara Vaibhav