विदर्भात साईबाबा पादुका दर्शन सोहळा, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 16:44 IST2017-10-10T16:44:03+5:302017-10-10T16:44:43+5:30
विदर्भात श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन २५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आल्याची माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.

विदर्भात साईबाबा पादुका दर्शन सोहळा, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची माहिती
अमरावती : विदर्भात श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन २५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आल्याची माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली. यानिमित्त विदर्भात तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पत्रपरिषदेला अमरावतीचे अशोक असोरीया, नागपूरचे पंकज महाजन, मोहन चव्हाण, आशिष चिरकुटे, पुलगावाचे अशोक चांडक, महेश राठी व धनराज वर्मा उपस्थित होते. नागपूर येथील श्री सदगुरू साई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने साई समाधी शताब्दी महोत्सव समितीची विदर्भात स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार समितीने २५ ते २७ जानेवारीदरम्यान नागपूर येथील महाल परिसरातील चिटणविस पार्कमध्ये पादुका दर्शन सोहळा होईल. दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रमात १०८ कुंडी महायज्ञ, सामूहिक साई पारायण, भजन संध्या, कीर्तन आणि महानाट्य सादरीकरणासह रक्तदान शिबिर, कर्करोग तपासणी शिबिर, नेत्रतपासणी, अवयवदान संकल्प व ११ हजार निमवृक्ष वितरण करण्यात येणार आहेत. मुख्य आकर्षणात श्री साई समाधी मंदिर व द्वारकामाई प्रतिकृती साकारली जाणार असून विश्व विख्यात चित्रकार सुनील शेगावकरद्वारा चित्रित साई जीवनचरित्रावर आधारित चित्रप्रदर्शनी राहणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार व शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
अशी राहील महोत्सवाची रुपरेषा..,
२५ जानेवारी- भंडारा येथील दसरा मैदान
२९ जानेवारी- गोंदियातील कशिश लॉन
३० जानेवारी - गडचिरोली
३१ जानेवारी पुलगावातील साईधाम ग्राऊंड
१ फेब्रुवारी - चंद्रपुरातील राजीव गांधी सभागृह
२ फेब्रुवारी - यवतमाळातील शिंदे नगर प्रांगण
३ फेब्रुवारी - वर्धा येथील न्यु इंग्लिश स्कूल प्रांगण
४ फेब्रुवारी - अमरावतीतील साईनगरातील साई मंदिर
५ फे ब्रुवारी - अकोला येथील साईमंदिर
६ फेब्रुवारी - खामगावातील अकोला रोडवरील साई मंदिरात महोत्सव पार पडणार आहेत.