भावी शिक्षकांची अभियोग्यता आजपासून, बुद्धिमापन चाचणी द्यावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 05:26 PM2017-12-11T17:26:33+5:302017-12-11T17:26:56+5:30

अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला मंगळवार, १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Today, the applicability of future teachers will have to be tested in the intelligence service | भावी शिक्षकांची अभियोग्यता आजपासून, बुद्धिमापन चाचणी द्यावी लागणार

भावी शिक्षकांची अभियोग्यता आजपासून, बुद्धिमापन चाचणी द्यावी लागणार

Next

अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला मंगळवार, १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शासनाकडून घेण्यात येणारी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा १२ ते २१ डिसेंबरदरम्यान आॅनलाइन होणार आहे. राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्याचे नियोजन शासनाने केले असले तरी शिक्षक भरतीसाठी नेमक्या किती जागा रिक्त आहेत, याची शासनाने आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे आता किती भरली जाणार याकडेही भावी शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
अशी होणार भरती
या भरतीसाठी शासनाने अद्ययावत पद्धत वापरली आहे. शिक्षणसेवक व शिक्षक भरतीसाठी सरल पोर्टलवर असलेल्या विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना मान्यताच मिळणार नाही. तसेच रिक्त जागांची माहिती मिळताच अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन केले जाणार आहे. बिंदूनामावलीसाठी 'पवित्र' हे पोर्टल सुरू केले आहे.

काय आहे अभियोग्यता चाचणी ?
वस्तुनिष्ठ २०० प्रश्न विचारले जाणार आहेत. यात परीक्षार्थीला पाच वेळा संधी मिळणार आहे. मराठी व इंग्रजी हे माध्यम आहे. भरतीवर नियंत्रण आणल्यामुळे यापुढे आता संस्थाचालकास नात्यागोत्यातील किंवा मर्जीतील शिक्षक घेता येणार नाहीत.

Web Title: Today, the applicability of future teachers will have to be tested in the intelligence service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.