विद्यार्थ्याला एका नोंदणीवर मिळाले दोन आधार कार्ड, दोन्हींचे लिंक नाही, शासनाच्या योजनांपासून वंचित 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 06:09 PM2018-01-08T18:09:13+5:302018-01-08T18:10:43+5:30

मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षाच्या मुलाच्या घरी त्याचे दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरी पोहोचले आहेत

The student got one registration, two Aadhar cards, both of them do not have links, government schemes are deprived | विद्यार्थ्याला एका नोंदणीवर मिळाले दोन आधार कार्ड, दोन्हींचे लिंक नाही, शासनाच्या योजनांपासून वंचित 

विद्यार्थ्याला एका नोंदणीवर मिळाले दोन आधार कार्ड, दोन्हींचे लिंक नाही, शासनाच्या योजनांपासून वंचित 

googlenewsNext

गोपाल डाहाके
मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील एका विद्यार्थ्याला दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरपोच मिळाले आहेत. आधारसाठी आवश्यक असणा-या सर्व गोष्टी युनिक असताना, हा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोर्शी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरील अंबाडा येथे संचित वासुदेव वानखडे या सहा वर्षाच्या मुलाच्या घरी त्याचे दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे आधार कार्ड घरी पोहोचले आहेत. पहिल्या आधारवर ५७१७ ६०३४ ७२९१ हा क्रमांक आहे, तर दुस-या आधारवर ७६५० ३८२६ २०६९ असा क्रमांक नमूद आहे. यामुळे शासकीय कामात कोणते आधार कार्ड वापरावे, असा प्रश्न त्याच्या पालकांना पडला आहे. 

नोंदणी एकदाच
संचितची ३१ |गस्ट २०१६ रोजी मोर्शी येथील आठवडी बाजार परिसरातील सेतु केंद्रात आधार कार्डसाठी नोंदणी केली होती. बोटांचे ठसे, डोळ्यांचा रेटिना व अन्य आवश्यक माहिती केवळ एकदाच नोंदविण्यात आली. यावेळी त्याच्यासोबत आई रेखा व वडील वासुदेव होते. 

नामांकन दोनदा
आधारसाठी नोंदणी करतेवेळी दोनवेळा नामांकन प्राप्त झाले. पहिले नामांकन क्रमांक २०३४/३०५२३/००८६८, तर दुसरे २०३४/३०५२३/००८६७ असे होते. आधार कार्ड एकच मिळेल, असे सांगितले गेल्याने संचिंतच्या पालकांनी फारसे मनावर घेतले नाही. यानंतर मुलाचे दोन आधार घरी आले. 
 
स्कॉलरशिप, बँक खाते नाही
संचित अंबाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यात आला. मात्र, त्याचे दोन्ही आधार क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने लिंक होत नाहीत. गरजेचे असणारे बँक खातेदेखील ऊघडू शकले नाही. 

एनआयसीने ठरवून दिलेल्या आधार केंद्राला मदत करणे, जास्तीत जास्त आधार कार्ड बनविणे व देखरेख ठेवणे ही कामे आमच्याकडे आहेत. तांत्रिकदृष्ट्या बायोमेट्रिकबद्दल माहिती आमच्याकडे नाही; जिल्हास्तरावरून ती माहिती मिळू शकेल. 
- अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार, मोर्शी
 

Web Title: The student got one registration, two Aadhar cards, both of them do not have links, government schemes are deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.