बिबट्याची मचाणावर शाही मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:25 PM2017-11-21T23:25:38+5:302017-11-21T23:26:07+5:30
चकवू लाकडाच्या मचाणावर बिबट्याने चितळाची शिकार खाल्ल्याचे गेल्या तीन दिवसांपासून निदर्शनास येत आहे.
अमोल कोहळे ।
आॅनलाईन लोकमत
पोहरा बंदी : चकवू लाकडाच्या मचाणावर बिबट्याने चितळाची शिकार खाल्ल्याचे गेल्या तीन दिवसांपासून निदर्शनास येत आहे. रविवारच्या जंगल सफारीत वनपर्यटकांना चिरोडी वनक्षेत्रात हा क्षण अनुभवता आला.
मेळघाटासारख्या घनदाट जंगलात आतापर्यंत तरी असा प्रसंग आढळून आलेला नाही. मात्र, हा क्षण चिरोडी वनक्षेत्रात पर्यटकांना दिसून आला. पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात ठिकाणी मचाण तयार करण्यात आले आहे. सदर मचाणावर बसून वनरक्षक बीट मदततीस टेहाळणी करतात. अशाच एका मचाणावर बिबट्याने चितळाची शिकार करून त्या वडाच्या झाडानजीक असलेल्या एका लाकडाच्या मचाणावर ठार केलेल्या चितळाला नेले व तेथे बसून बिबट्याने सलग तीन दिवस त्या ठार केलेल्या चितळाचा मनसोक्त फडशा पाडला. मचाणावर चितळाचा लचका तोडल्याचे वनकर्मचाºयांच्या निदर्शनास आले. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. आतापर्यंंत बिबट शिकार झाडाला टांगते असे निदर्शनास येत होते. मात्र, प्रथमच पायºया चढून बिबटाने मचाणाच्या टॉपवर नेऊन चितळ खाल्ल्याची नोंद घेण्यात आली आहे.