अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गारांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 10:03 IST2018-02-11T10:03:01+5:302018-02-11T10:03:33+5:30
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गारांसह जोरदार पाऊस बरसला. साधारण संत्र्याच्या आकाराएवढी मोठी गार येथे पहावयास मिळाली.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गारांचा पाऊस
ठळक मुद्देसंत्र्याच्या आकाराएवढी एकेक गार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गारांसह जोरदार पाऊस बरसला. साधारण संत्र्याच्या आकाराएवढी मोठी गार येथे पहावयास मिळाली. जवळपास दहा मिनीटे हा जोरदार वर्षाव येथे सुरू होता. तालुक्यातील विहीगाव, चिंचोली, सातेगाव, मूर्खादेवी, कापूसतळणी, गावंडगाव, टाकरखेडासह अन्य गावांमध्येही हा गारांचा वर्षाव झाला आहे. यामुळे संत्रा, हरभरा, कापूस व गव्हाच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.