खूशखबर... राज्यात वैद्यकीय अधिका-यांची ‘मेगा’ भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 05:08 PM2018-07-21T17:08:03+5:302018-07-21T17:11:16+5:30

या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Good news ... recruitment of mega officers of medical officers in the state | खूशखबर... राज्यात वैद्यकीय अधिका-यांची ‘मेगा’ भरती

खूशखबर... राज्यात वैद्यकीय अधिका-यांची ‘मेगा’ भरती

अमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिका-यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाने पाऊल उचलले असून, त्या अन्वये ७२३ पदे भरली जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ ची ही पदे भरण्यासाठी स्वतंत्र निवड मंडळ गठित करण्यात आले असून, ३१ जुलैपर्यंत अर्ज स्वीकृती केले जातील.

३१ मे रोजी राज्यातील २२६ वैद्यकीय अधिकाºयांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमिवर वैद्यकीय अधिकारी रिक्त पदाचा अनुशेषाचा मुद्दा प्रकर्षाने तापला होता. ३१ मे रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण करणाºया २२६ वैद्यकीय अधिका-यांना सेवानिवृत्त न करता अटी-शर्तीच्या अधीन राहून त्यांना मुदतवाढ दिल्याने नव्या पदभरतीवरही प्रश्नचिन्ह लागले होते. मात्र, ७२३ पदांसाठी जाहिरात करीत आरोग्य विभागाने त्यास पूर्णविराम दिला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र  वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अशा आहेत जागा
विशेष मागास प्रवर्ग - ६६, इमाव - ०८, खुला ६४९

यांना प्राधान्य
भिषक, बालरोग तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ व रक्तसंक्रमण अधिकारी या विशेषज्ञ शाखेतील पदव्युत्तर-पदविका व पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.


वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ ची ७२३ पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ३१ जुलैपर्यंत पूर्ण भरलेला अर्ज आरोग्य सेवा संचालक कार्यालयात पाठवावा.
- व. मुं. भरोसे,
उपसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग

Web Title: Good news ... recruitment of mega officers of medical officers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी