ओबीसींच्या हक्कासाठी जदचा मंत्रालयाला घेराव
By Admin | Updated: August 12, 2016 00:17 IST2016-08-12T00:17:21+5:302016-08-12T00:17:21+5:30
मंडल आयोग लागू करण्याच्या घटनेला २५ वर्र्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ओबीसी प्रवर्गाच्या

ओबीसींच्या हक्कासाठी जदचा मंत्रालयाला घेराव
ढोलेंचे नेतृत्व : आंदोलकांना अटक व सुटका
चांदूररेल्वे : मंडल आयोग लागू करण्याच्या घटनेला २५ वर्र्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ओबीसी प्रवर्गाच्या अपूर्ण मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेश अध्यक्ष शरद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग ढोले यांच्या नेतृत्वात ८ आॅगस्ट रोजी मंत्रालयाला घेराव घालण्यात आला.
ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी, नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी, विना अनुदानित व्यवस्थापक अभ्यासक्रमात शैक्षणिक शुल्काची १०० टक्के परिपूर्ती व्हावी, ओबीसींना घरकूल द्यावे, ओबीसीची जातनिहाय जनगणना जाहीर करावी, वसतिगृह द्यावे आदी मागण्यांसाठी जनता दलाने मुंबई मंत्रालयाला घेराव घातला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. अटक केल्यानंतर आंदोलकांनी जोरदार नारेबाजी सुरू केली. यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील, माजी आमदार पांडुरंग ढोले, प्रताप होगाडे, नाथा शेवाले, नंदेश अंबाडकर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)