आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारेला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:10 IST2018-01-06T18:10:32+5:302018-01-06T18:10:51+5:30
थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारे या युवकाने रौप्यपदक पटकावले.

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारेला रौप्यपदक
अमरावती : थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारे या युवकाने रौप्यपदक पटकावले. अजिंक्य असनारे हा या जागतिक स्पर्धेत ७० किलोवरील वजनगटात सहभागी झाला होता. विविध देशांच्या शरीरसौष्ठवपटूंना पछाडत या २२ वर्षीय युवकाने पीळदार शरीरसंपदेच्या बळावर रौप्यपदकावर नाव कोरले. तो अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे अध्यक्ष अविनाश असनारे यांचा मुलगा आहे.
प्राचार्य विजय भांगडिया, सतीश मोदानी गजेंद्र रघुवंशी यांच्यासह शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी विकास पांडे, विशाल शिंदे, संतोष कुकडे, सतीश यावले यांना त्याने आपल्या यशाचे श्रेय दिले आहे.