विजेच्या धक्क्याने वायरमन ठार
By Admin | Updated: May 28, 2014 22:19 IST2014-05-28T21:49:05+5:302014-05-28T22:19:18+5:30
सबस्टेशनवरून वीज पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक वीज सुरू झाल्यामुळे ज्ञानेश्वर मसे या वायरमनचा जागीच मृत्यू झाला.

विजेच्या धक्क्याने वायरमन ठार
मूर्तिजापूर : सबस्टेशनवरू न वीज पुरवठा बंद करू न दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक वीज सुरू झाल्यामुळे ज्ञानेश्वर मसे या वायरमनचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दाळंबी कोळंबी जवळच्या मुस्तफापूर येथे घडली. बोरगाव मंजू पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या ठिकाणी वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी चार वायरमन आले होते. तीन जण खाली तर एक जण वर चढला. मात्र वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे ही घटना घडली. वीज पुरवठा कोणी सुरू केला, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
ताप्र