तुषार पुंडकर हत्याकांड : मध्य प्रदेशच्या दिशेने तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:00 PM2020-02-24T12:00:10+5:302020-02-24T12:00:29+5:30

आरोपी मध्य प्रदेशमध्ये पसार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tushar Pundkar Massacre: Investigation begins toward direction of Madhya Pradesh | तुषार पुंडकर हत्याकांड : मध्य प्रदेशच्या दिशेने तपास सुरू

तुषार पुंडकर हत्याकांड : मध्य प्रदेशच्या दिशेने तपास सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी धागेदारे जुळविण्यास सुरुवात केली असून, एक पथक मध्य प्रदेशच्या दिशेने तपास घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी अमरावती परिक्षेत्रातील कुशल पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे.
अकोटपासून मध्य प्रदेशची सीमा जवळ असल्याने आरोपी मध्य प्रदेशमध्ये पसार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी पोलीस महासंचालकांनी समांतर पथक गठित केले असून, पथकामध्ये अकोट शहरात यापूर्वी सेवा दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. याशिवाय, स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर सहा पथकेही गठित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस तुषार पुंडकर यांच्या फोन कॉल्स हिस्ट्रीच्या माध्यमातून सुगावा जुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेल्याने अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळाजवळचा दवाखाना, बँकेचे सीसी फुटेज बघितले; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

तुषार कोणाची ओळख करून देणार होते?
तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार होण्याच्या दोन तासपूर्वी त्यांची भेट संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले आणि पवन महल्ले यांच्याशी झाली होती. या भेटीसंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांनाही माहिती दिली असून, याचा फायदा तपासात होऊ शकतो. त्यानुसार, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले व पवन महल्ले हे शुक्रवारी अकोट येथील अभ्यासिकेचे उद्घाटन आटोपून सत्यपाल महाराज यांच्या मातोश्रींच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांची भेट तुषार पुंडकर यांच्याशी झाली. दर्यापूर रोडवर पुंडकर यांची गाडी बंद पडल्याने ते रस्त्यावर उभे होते. त्यांनी पुंडकर यांना गाडीत बसण्याची विनंती केली; मात्र पुंडकर यांनी नकार देत चहा घेण्याचा आग्रह केला. दरम्यान, पुंडकर यांनी दोन मित्रांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या दोघांनीही ओळख करून घेणे टाळले व ते तिघेही दुचाकीवर निघून गेले.

Web Title: Tushar Pundkar Massacre: Investigation begins toward direction of Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.