युवकाची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:06 IST2017-10-22T22:03:47+5:302017-10-22T22:06:33+5:30
सायखेड: धाबा पोलीस चौकीअंतर्गत येणार्या सकनी येथील विवाहित युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २१ ऑक्टोबरच्या सायंकाळी घडली.

युवकाची विष प्राशन करून आत्महत्या
ठळक मुद्देसकनी येथील घटनाअकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेड: धाबा पोलीस चौकीअंतर्गत येणार्या सकनी येथील विवाहित युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २१ ऑक्टोबरच्या सायंकाळी घडली.
सुमेध भारत खडसे (३६) असे मृतकाचे नाव असून, त्याने सकनीलगत असलेल्या रस्त्यावरील वडाच्या झाडाखाली शनिवारी सायंकाळी विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी ता तडीने अकोला येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान २२ ऑक्टोबरच्या पहाटे ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा आप्त परिवार असून, २२ ऑक्टोबर रोजी सकनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.