पणज येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 01:43 IST2016-09-22T01:43:05+5:302016-09-22T01:43:05+5:30

एक लाखाच्या रोख रकमेसह ९0 हजाराचे सोने लंपास

Stolen two places at the same night at the feast day | पणज येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

पणज येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी

आकोट(जि. अकोला), दि. २१- ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पणज येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी १ लाखाच्यावर रोख रकम व ९0 हजाराचे सोने लंपास केले.
पणज येथील विजय उत्तमराव अस्वार (३५) हे २0 सप्टेंबरच्या रात्री कुटुंबियांसमवेत झोपले होते. रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करुन १ लाख रुपयांची रोख रक्कम व ९0 हजार रुपये किंमतीचे ३८ ग्रॅम सोने लंपास केले. तसेच चोरट्याने घरातील खाद्यपदार्थावर तावसुध्दा मारला. अशा आशयाची फिर्याद विजय अस्वार यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. दुसर्‍या घटनेत पणज येथीलच फईमोद्दिन सलीमोद्दिन यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला व रोख २६00 रुपये चोरून नेले अशी तक्रार फईमोद्दिन यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. उपरोक्त दोन्ही प्रकरणी फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द भादंविच्या ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Stolen two places at the same night at the feast day